शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

११ बीआरडीत ऐतिहासिक मिग-२९ होणार अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:54 IST

वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपसोनिक मीग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे अद्ययावतीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.

नाशिक : वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपसोनिक मीग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे अद्ययावतीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ससाणा पक्षाप्रमाणे आकाशात उंचभरारी घेतानाही लक्षावर नजर ठेवून अचूक मारा करीत शत्रूला टिपण्याची क्षमता असलेल्या या ऐतिहासिक विमानाची वायुदलात ‘बाज’अशी ओळख असून, या विमानाने शनिवारी (दि.२८) ओझर ११ रिपेअर डेपोच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वी आकाशात चित्तथराराक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.वायुदलाच्या २८ स्क्वॉड्रनच्या मीग- २९ सुपसोनिक विमानाने ग्रुप कॅप्टन जे. एस.पटेल यांच्या नेतृत्वाखाली अखेरचे उडान भरल्यानंतर ओझरच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वी सादर केलेल्या कवायतीनी लक्ष वेधून घेतले. हे विमान ११ बीआरडी येथे देखभाल दुरुस्तीसह आधुनिकीकरणासाठी आणण्यात आली आहेत. याठिकाणी मिग -२९ विमानांची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच त्यांना अद्ययावत करून पुन्हा देशसेवेसाठी सज्ज केले जाणार आहे. या ऐतिहासिक विमानाचे ११ बीआरडी येथे दिमाखदार सोहळ्यात एयर कमोडोर समीर बोराडे यांनी स्क्वॉड्रनचे कमांडर जे. एस. पटेल यांना स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. या सोहळ्यात ओझर येथील वायूसेना स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह एचएएलचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.११ बीआरडीने आतापर्यंत पाचशेहून अधिक लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण करून त्यांना पुन्हा युद्धासाठी सज्ज करून सीमा संरक्षणाच्या दृष्टीने अतुलनीय योगदान दिले आहे. यात एसयू-७, मिग-२३, मिग-२९ आणि एसयू -३०एमकेआय विमानांचा समावेश आहे. याठिकाणी मिग-२९ विमानांचे आधुनिकीकरण १९९६ पासून सुरू झाले असून सद्यस्थितीत येथे मिग-२९ चे आणि एसयू-३० एमकेआय विमानांची देखभाल दुरुस्तीसह त्यांना अद्ययावत करण्यात येत आहे.मिग २९ अधिकशक्तिशाली होणारओझरे येथे ११ बीआरडीच २८ स्क्वॉड्रनच्या मिग -२९ विमानांच्या लँडिंगसोबतच एका प्रभावशाली युगाचा अंत झाला असला तरी या विमानांनी देशाच्या संरक्षणार्थ वेगवेगळ्या कारवायांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. यात कारगिल युद्धासह पुलवामा हल्ल्यानंतरच्या कारवाईतही या विमानांचा समावेश होता. प्रथम सुपरसोनिक मीग २९- विमान १९८६ मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांचा युद्धजन्य स्थितीत देशाच्या सीमा रक्षणात सिंहाचा वाटा राहिला आहे. आता ही विमाने अद्ययावत करण्यात येत असून यातील शेवटचे विमानाही ११ बीआरडी येथे दाखल झाले आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलNashikनाशिक