शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

१९ दुचाकी चोरणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:17 IST

मालेगाव : येथील किल्ला व छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १९ दुचाकी चोरणाºया सहा जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमालेगाव : नंबर प्लेट बदलताना सहा संशयित ताब्यात, एक फरार

मालेगाव : येथील किल्ला व छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १९ दुचाकी चोरणाºया सहा जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईत अतहर समसुद्दोहा अन्सारी व खालीद अख्तर निहाल अहमद दोघे रा. निहालपुरा यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा साथीदार मोहंमद मुस्लीम हा फरार झाला आहे. त्यांच्या ताब्यातून १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर छावणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकनाथ मन्साराम अहिरे रा. कुकाणे, पुरुषोत्तम लक्ष्मण डांगचे रा. सानेगुरुजीनगर कॅम्प, मुकेश घनश्याम वºहाडे रा. मधुबन कॉलनी कलेक्टरपट्टा व शुभम संजय शिंदे रा. द्याने (ता. मालेगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या.जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व पोलीस नाईक किशोर नेरकर यांना मिळालेल्या माहितीनुसार मालेगावी काही इसम एका गॅरेजमध्ये दुचाकीची नंबर प्लेट, चेसी नंबर, इंजिन नंबरमध्ये फेरफार करताना दिसले. पोलिसांनी सदर गॅरेजचा शोध घेऊन गॅरेज मालकाची भेट घेतली. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता दुचाकीचोर अजमल खा चौक येथे येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक पटारे, उपनिरीक्षक पाटील, डोखे, हवालदार अहिरे, पोलीस नाईक पाटील, नेरकर, देवराज भामरे, नाकोडे, पोलीस कर्मचारी चव्हाण, बागुल, निकाळे यांनी अजमल खा चौक येथे सापळा लावला.दोन्ही दुचाकी चोर अजमल खा दुचाकीवर आले असता त्यांना पोलीस पथकाने पकडले. अधिक चौकशी केली असता मालेगावच्या कॅम्प, छावणी, शहर, पवारवाडी, आझादनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून १६ दुचाकींची चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या असून, आरोपींना अटक केली आहे.पैकी त्यांचा साथीदार मोहंमद मुस्लीम हा फरार आहे. मोहंमद मुस्लीम हा फिटर असून चोरट्यांनी गॅरेजवर नेलेल्या दुचाकींना रंग देऊन नंबर प्लेट बदलून दुचाकी आकर्षक करून इंजिन नंबर बदलत असे. जून २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. ज्यांची दुचाकी चोरीला गेली असेल अशा नागरिकांनी कागदपत्र घेऊन ओळख पटवून दुचाकी घेऊन जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.शहर परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी पकडलेल्या दुचाकी चोरांमुळे आणखी दुचाकी चोºया उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.किल्ला-छावणी पोलिसांची कारवाई छावणी पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकनाथ मन्साराम अहिरे रा. कुकाणे, पुरुषोत्तम लक्ष्मण डांगचे रा. सानेगुरुजीनगर कॅम्प, मुकेश घनश्याम वºहाडे रा. मधुबन कॉलनी, कलेक्टरपट्टा व शुभम संजय शिंदे रा. द्याने (ता. मालेगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईत अतहर समसुद्दोहा अन्सारी व खालीद अख्तर निहाल अहमद दोघे रा. निहालपुरा यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा साथीदार मोहंमद मुस्लीम हा फरार झाला आहे. त्यांच्या ताब्यातून १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या.