शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पेठ चेक नाक्यावर १९ लाखांची रोकड जप्त

By श्याम बागुल | Updated: April 6, 2019 18:58 IST

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असली तरी, ही मर्यादा ओलांडून उमेदवारांकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. परंतु निवडणूक आयोगाला खर्च सादर करताना तो अगदी कमी दाखविला जातो. अन्य खर्च उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते, नातेवाइकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो.

ठळक मुद्देसुरतहून येणाऱ्या गाडीची झडती : आयकर विभागाकडे चौकशी जिल्ह्यांना लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमांवर चेकनाके बसविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदारांना उमेदवारांकडून पैसे व वस्तुंचे वाटप होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्याच्या सीमांवर चेकनाके उभारून येणाऱ्या-जाणा-या वाहनांची तपासणी केली जात असताना शनिवारी पहाटे पेठनजीकच्या पिठुंदी चेकनाक्यावर सुरतहून येणा-या वाहनांची तपासणी केली जात असताना नाशिक पासिंग असलेल्या वाहनात १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोकड संशयास्पद सापडली असून, सदरची रक्कम ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी ती आयकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ही तिसरी घटना असून, तिन्ही प्रकरणात चौकशी सुरू आहे.

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असली तरी, ही मर्यादा ओलांडून उमेदवारांकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. परंतु निवडणूक आयोगाला खर्च सादर करताना तो अगदी कमी दाखविला जातो. अन्य खर्च उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते, नातेवाइकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो. मतदारांना पैसे वाटप करणे, दारू व भेटवस्तू देणे आदी कारणासाठी मोठ्या प्रमाणावर हवाला वा अन्य मार्गाने पैसे गोळा करून वाटप केले जातात. ते टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने यंदा प्रत्येक व्यक्तीच्या बॅँक व्यवहारांवर नजर ठेवली असून, एक लाखापेक्षा अधिक रकमेचे हस्तांतरण वा खात्यात जमा झाल्यास त्याची दखल घेतली जात आहे. त्याच धर्तीवर पर राज्य व जिल्ह्यांना लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमांवर चेकनाके बसविण्यात आले आहेत. या चेकनाक्यावर नियुक्त केलेल्या पथकामार्फत जिल्ह्यात प्रवेश करणा-या व बाहेर जाणा-या वाहनांची तपासणी केली जात असताना शनिवारी पहाटे ३.३० वाजता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पेठ येथील पिठुंदी चेकनाक्यावर सुरतहून येणारी क्रेटा कंपनीची कार (क्रमांक एम.एच. १५ जी.आर. ४००७) हिची तपासणी केली असता, त्यात पथकाला १८लाख ९० हजार ९७० रोख रक्कम सापडली. या संदर्भात कारमध्ये बसलेले विनायक भाऊसाहेब खरात व प्रदीप रामदास शेटे (रा. चांदोरी ता. निफाड) या दोघांकडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नसल्याने पथक प्रमुख एम. आर. शिंदे यांनी म्हटले आहे. सदरची रक्कम ताब्यात घेण्यात आली असून, अधिक चौकशीसाठी आयकर विभागाला कळविण्यात आले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिकPoliticsराजकारण