शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७५८ रुग्ण रुग्णालयातून घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 01:08 IST

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.शनिवारी नाशिक जिल्ह्यातील १७५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १४२४ रुग्ण जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ७२१ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून, त्यातील ६३ हजार ०९७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या ७३२९ असून आतापर्यंत एकूण १२९५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील ६६२, नाशिक ग्रामीण हद्दीतील ७०४ मालेगाव महापालिका हद्दीतील १५१, नाशिक ग्रामीणला ४१२, तर जिल्हा बाह्य २८ रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २० रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला असून, त्यातील १० रुग्ण नाशिक शहरातील तर ग्रामीणमध्ये १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ७१ हजार ७२१ तर अहवाल प्रलंबित असलेल्या रुग्णांची संख्या १७१९ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ५३ हजार १७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील एक लाख ७९ हजार ६६१ इतके रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी ३५०० रुग्ण हे नाशिक महानगरपालिका रुग्णालयांमध्ये तसेच गृहविलगीकरण आहेत. ३२०१ रुग्ण हे मालेगावच्या महानगरपालिका रुग्णालयांमध्ये तर ५१७ रुग्ण हे मालेगावला असून, जिल्हाबाह्य १११ रुग्ण दाखल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या