शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

१७०० पदे रिक्त, कसे होणार शहर स्वच्छ? पालिकेची अवस्था : शासनाकडे याचना

By admin | Updated: May 22, 2014 00:16 IST

नाशिक : वाढत्या लोकसंख्येच्या आणि वसाहतीच्या तुलनेत महापालिकेकडे सफाई कामगारांची तब्बल १७२४ पदे रिक्त असून, त्यामुळे शहर स्वच्छ कसे ठेवायचे, असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शासन कंत्राटी पद्धतीने भर देते आणि दुसरीकडे सफाई कामगारांच्या संघटना त्यास विरोध करीत असल्याने आरोग्य विभाग पेचात सापडला आहे.

नाशिक : वाढत्या लोकसंख्येच्या आणि वसाहतीच्या तुलनेत महापालिकेकडे सफाई कामगारांची तब्बल १७२४ पदे रिक्त असून, त्यामुळे शहर स्वच्छ कसे ठेवायचे, असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शासन कंत्राटी पद्धतीने भर देते आणि दुसरीकडे सफाई कामगारांच्या संघटना त्यास विरोध करीत असल्याने आरोग्य विभाग पेचात सापडला आहे.दहा हजार लोकसंख्येला २५० सफाई कामगारांची गरज भासते. त्याचा विचार केला तर २०११ च्या जनगणनेनुसार १४ लाख ८६ हजार नाशिकची लोकसंख्या आहे. त्यामुळे महापालिकेला ३ हजार ७१७ सफाई कामगार अपेक्षित आहेत. सध्या १९७३ सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे चारशे सफाई कामगार कामाच्या आणि स्वत:च्या सोयीने नगरसेवकांच्या शिफारसीनुसार लिपिक, संगणक ऑपरेटर आणि अन्य तत्सम कामे करीत आहेत. नवीन कर्मचारी भरतीसाठी आरोग्य विभागाने प्रशासन विभागामार्फत राज्यशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. परंतु राज्यशासन मंजुरी देत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. नगरविकास विभाग कंत्राटी पद्धतीने साफसफाईची कामे करण्याची सूचना देते. परंतु खासगीकरणातून साफसफाईची तयारी केली की सफाई कामगारांच्या संघटना विरोध करतात. त्यामुळे पालिकेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या कुंभमेळा तोंडावर असून त्यासाठी ८ विभागीय स्वच्छता निरीक्षक, २० स्वच्छता निरीक्षक, ४० मुकादम आणि ४५० सफाई कामगारांची गरज आहे. परंतु ही कामेदेखील कंत्राटी पद्धतीनेच करण्याच्या सूचना आहेत. भरतीसाठी नगरसेवकही आग्रही पण...महापालिकेत भरती मोहीम राबवावी. किमान मानधनावर सफाई कामगारांची भरती करावी, यासाठी नगरसेवक मागणी करतात. परंतु प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त त्याची कोणतीही दखल घेत नसल्याने वर्षानुवर्षे हीच समस्या कायम आहे. विद्यमान सत्ताधिकारीदेखील या समस्येवर उपाययोजना करण्यास अपयशी ठरले आहेत.