शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

१७ हजार शेतकरी पीककर्जापासून वंचित

By admin | Updated: March 26, 2017 00:25 IST

नाशिक : दरवर्षी नियमित कर्ज घेऊन शंभर टक्के परतावा करणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या जवळपास १७ हजार शेतकऱ्यांना पीककर्जच मिळाले नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

गणेश धुरी : नाशिकएकीकडे नोटाबंदीचा फटका अन् दुसरीकडे शेतकऱ्यांना असलेले कर्जमाफीचे आमिष यामुळे रखडलेली पीककर्जाची वसुली अशा दुहेरी संकटात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक असतानाच दरवर्षी नियमित कर्ज घेऊन शंभर टक्के परतावा करणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या जवळपास १७ हजार शेतकऱ्यांना पीककर्जच मिळाले नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. जिल्हा बॅँकेला मागील आर्थिक वर्षात एकूण कर्जदार शेतकऱ्यांपैकी नियमितपणे पीककर्ज उचलणाऱ्या सुमारे १७ हजार शेतकऱ्यांना पावणे तीनशे कोटींचे पीककर्ज देऊ न शकल्याची माहिती जिल्हा बॅँकेच्या एका संचालकाने दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दरवर्षी साधारणत: २ लाख ४५ ते २ लाख ५० हजार शेतकरी सभासदांना १३०० ते १४०० कोटींचे पीककर्ज वाटप केले जाते. चालू आर्थिक वर्षात मात्र २ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जाची मागणी केलेली असताना सुमारे २ लाख २५ शेतकऱ्यांना सुमारे १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले. दरवर्षी सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना कमी अधिक फरकाने इतकेच कर्ज दिले जाते. यावर्षी पीककर्जाचे एकरी दर पिकानुसार वाढल्याने सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनाच १७५० कोटींचे कर्जवाटप झाले. यामुळे कमी शेतकऱ्यांना जास्त पीककर्ज वाटप झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे १७ हजार शेतकऱ्यांना हवे असलेले २७५ कोटींचे पीककर्ज जिल्हा बॅँक देऊ शकली नाही. जिल्हा बॅँकेलाही सुमारे साडेचारशे कोटी अतिरिक्त देण्याचे मान्य केले होते. मात्र शिखर बॅँकेकडून जिल्हा बॅँकेला निधी वितरित न झाल्यानेच जिल्हा बॅँकेला नियमित कर्जफेड करणाऱ्या १७ हजार शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.