शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात १७ टक्के वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:27 IST

नाशिक : जिल्ह्यात रु ग्ण पूर्णपणे बरे होण्याची टक्केवारी जुलै महिन्याच्या प्रारंभी ५७ टक्क्यांच्या आसपासइतकी झाली होती. त्यात चांगलीच भर पडून आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात हे प्रमाण ७५ टक्क्यांच्या नजीक पोहोचले आहे. महिनाभरात सुमारे १७ टक्के इतकी वाढ झाली असल्याने नाशिककरांच्या दृष्टीने ती दिलासादायक बाब आहे.

ठळक मुद्देनाशिककरांना दिलासा : आॅगस्टच्या पूर्वार्धात कोरोनामुक्तीचे प्रमाण पोहोचले ७५ टक्क्यांनजीक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात रु ग्ण पूर्णपणे बरे होण्याची टक्केवारी जुलै महिन्याच्या प्रारंभी ५७ टक्क्यांच्या आसपासइतकी झाली होती. त्यात चांगलीच भर पडून आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात हे प्रमाण ७५ टक्क्यांच्या नजीक पोहोचले आहे. महिनाभरात सुमारे १७ टक्के इतकी वाढ झाली असल्याने नाशिककरांच्या दृष्टीने ती दिलासादायक बाब आहे.कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत असतानाच दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जून महिन्याच्या प्रारंभी रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण केवळ ५० टक्क्यांच्या आसपास होते. त्यानंतर जूनच्या अखेरीस त्यात सुमारे ११ टक्के वाढ होऊन ते प्रमाण ६१ टक्क्यांच्या आसपास पोहोचले होते, तर जुलै महिन्याच्या प्रारंभी त्यात घट होऊन ते प्रमाण ५७ टक्क्यांवर आले होते.कोरोनाबाधितांमध्ये वेगाने वाढ होत असली तरी जिल्ह्यातील बाधित बरे होऊन घरी परतण्याच्या प्रमाणातही गत महिनाभरात झालेली वाढ जिल्ह्याच्या दृष्टीने विशेष दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ७४.९१ टक्केजिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण सातत्याने वाढत असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.२४ टक्के इतके आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ७४.९२ टक्के, मालेगाव मनपामधून ७९.०४ टक्के व जिल्हाबाहेरील ८२.५८ टक्के इतके आहे. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७४.९१ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच आतापर्यंत बळी गेलेल्या सहाशेच्या आसपास असलेल्या रुग्णांपैकी जवळपास निम्मे रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील होते. त्यांना कोरोनाबरोबरच अन्य काही आजारांनीदेखील ग्रासले होते, असा प्रशासनाचा दावा आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य