शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १६६ मंगल कार्यालये, लॉन्स अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:25 IST

महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नियमबाह्य व अनधिकृतपणे वापर असलेले १६६ मंगल कार्यालये व लॉन्स आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५ मंगल कार्यालये व लॉन्सची संख्या एकट्या पंचवटीत आढळून आली आहेत. महापालिकेने आता या अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्स यांना नोटिसा बजावल्या आहेत.

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नियमबाह्य व अनधिकृतपणे वापर असलेले १६६ मंगल कार्यालये व लॉन्स आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५ मंगल कार्यालये व लॉन्सची संख्या एकट्या पंचवटीत आढळून आली आहेत. महापालिकेने आता या अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्स यांना नोटिसा बजावल्या आहेत.  शहरात मोठ्या प्रमाणावर मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. प्रामुख्याने, पंचवटीतील औरंगाबादरोडवर, तर शेतकºयांनी पुढे मंगल कार्यालय-लॉन्स आणि मागे शेती असा व्यवसाय थाटलेला आहे. त्यातील बºयाच मंगल कार्यालयांकडून महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही, तर अनेकांकडून महापालिकेला घरपट्टीही अदा केली जात नाही. त्यामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणावरील महसूल बुडतो आहे. याशिवाय, शहरातील अनेक मंगल कार्यालयांनी अनधिकृतपणे बांधकाम केल्याच्याही तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या आहेत, तर काही जागांवर नियमबाह्यपणे अनधिकृतपणे वापर सुरू आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील सर्व मंगल कार्यालये व लॉन्सचा विभागनिहाय सर्व्हे केला. त्यामध्ये तब्बल १६६ मंगल कार्यालये व लॉन्स अनधिकृत आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या पंचवटीत ६५ इतकी आढळून आलेली आहे. नगररचना विभागाने आता या मंगल कार्यालये व लॉन्सचालकांना नोटिसा बजावल्या असून, नियमबाह्य वापर थांबविला नाही, तर अतिक्रमण विभागाकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाणार आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात नामांकित लोकांचे मंगल कार्यालये व लॉन्स अनधिकृत आढळून आलेली असून, त्यात आजी-माजी नगरसेवकांच्या मालकीच्या मंगल कायालये-लॉन्सचाही समावेश आहे. तळघरांमध्ये १४ हॉटेल्स महापालिकेने टेरेसवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या ३८ हॉटेल्सला नोटिसा बजावल्या असतानाच अनधिकृतपणे इमारतीच्या तळघरांमध्ये सुरू असलेल्या १४ हॉटेल्सलाही नोटिसा बजावल्या आहेत. त्यात, पश्चिममधील विकी सागर, १२ टू १२ हॉटेल, फ्रंट पेज, पंचवटी इलाइट, हॉटेल फर्माईश, हॉटेल सत्कार व कोपा कबाना हॉटेल, नाशिक पूर्वमध्ये हॉटेल सिंग पॅलेस, हॉटेल कामत, पंचवटी विभागात हॉटेल गोंधळ, राही हॉटेल, न्यू पंजाब आणि हॉटेल प्राइड तसेच नाशिकरोड विभागातील साईलीला हॉटेल यांचा समावेश आहे. या हॉटेल्सचालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhotelहॉटेल