शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१.६५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य

By admin | Updated: June 13, 2017 00:47 IST

कर्जमाफी : नाशिक जिल्हा बॅँकेला हजार कोटींची गंगाजळी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असली तरी, कर्जमाफी अल्पभूधारकांना व केवळ पीककर्ज घेणाऱ्यांनाच माफ होणार असल्याचे वृत्त आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून केवळ पीककर्ज घेणाऱ्या १ लाख ६५ हजार १५१ शेतकऱ्यांना सुमारे एक हजार ४५ कोटींची कर्जमाफी सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे मिळणे शक्य आहे.राज्य शिखर बॅँकेने अतितत्काळ राज्यातील सर्व जिल्हा बॅँकांतील अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांची ८ अ नमुन्यात माहिती मागविली आहे. ८ अ नमुन्यानुसार असलेल्या जिंदगीपत्रकात नेमकी किती शेती आहे, क्षेत्रफळ किती, त्यावर कोणते पीक घेतले आहे यांसह अन्य बारीकसारीक बाबींचा तपशील दिलेला असतो. त्यानुसार ही माहिती अतितत्काळ मागविण्यात आली असून, सोमवारी (दि.१२) जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून जिल्हा आणि तालुका पातळीवरून माहिती गोळा करण्यात येत आहे. राज्य शिखर बॅँकेने ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंतचे अल्पभूधारक शेतकऱ्यांची थकबाकी तसेच ३० जून २०१७ अखेरपर्यंतची एकूण थकबाकी व त्यावरील व्याज याची माहिती मागविली आहे. सरसकट कर्जमाफीचा विचार केला तर मध्यम वर्गातील शेतकरी व लहान गटातील शेतकरी यांची माहिती

पुढीलप्रमाणे- पन्नास हजाराच्या आतील पीककर्ज थकबाकीदार एकूण शेतकरी संख्या ६७ हजार ५३०, एकूण रक्कम- २०४ कोटी ८३ लाख; पन्नास हजाराच्या पुढील व एक लाखाच्या आतील पीक कर्जदार शेतकरी- ६७ हजार ७६६, एकूण रक्कम ४८८ कोटी १५ लाख; एक लाख ते दीड लाखापर्यंतचे पीक कर्जदार शेतकरी- २९ हजार ८५५ शेतकरी, एकूण पीककर्ज रक्कम- ३५२ कोटी २० लाख असे एकूण १ लाख ६५ हजार १५१ शेतकरी व पीक कर्जाची रक्कम १०४५ कोटी १८ लाख इतकी आहे.मध्यम व लहान गटाच्या शेतकऱ्यांची संख्या ( पन्नास हजारापासून ते दीड लाखापर्यंतची एकूण संख्या )मध्यम गट- ५४ हजार ४७३ शेतकरी एकूण पीककर्ज रक्कम- २३३ कोटी ३ लाखलहान गट- ८७ हजार १३७ शेतकरी एकूण पीककर्ज रक्कम ५९७ कोटी ३१ लाखबहुधारक शेतकरी- २३ हजार ५४१ शेतकरी- एकूण पीककर्ज रक्कम २१४ कोटी ५३ लाख