शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १६.२मिमी पाऊस; 'अवकाळी'चा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 21:13 IST

हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला

ठळक मुद्देनाशिकचे द्राक्षे संकटात'लानिना'चा हवामानावर प्रभाव

नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.९) संध्याकाळी साडेसहा वाजेपासून सुमारे तासभर धुव्वाधार अवकाळी पाऊस झाला. अचानकपणे आलेल्या या पावसाने शहरातील मध्यवर्ती भागातील सर्वच रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहत होते. राजीव गांधी भवनासमोर शरणपुररोडवर पावसाचे पाणी तुंबल्याने या भागाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. सात वाजेनंतर उपनगरांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. साडेसहा वाजेपासून संध्याकाली पावणेआठ वाजेपर्यंत शहर व परिसरात १६.८ मिमी इतका पाऊस झाला.उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पुर्वेचे वारे यांचा मिलाफ हा राज्याच्या किनारपट्टीवर झाल्यामुळे ढगनिर्मितीला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. किनारपट्टीवर उंच ढग दाटले असून या भागात वीजांचा गडगडाटासह वादळी स्वरुपाचा पाऊस होत आहे. तसेच अन्य भागांमध्ये काही वेळ अचानकपणे दमदार पाऊस होऊ लागला आहे. हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला तर किमान तापमान सकाळी २० अंशापर्यंत पोहचल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली. तसेच वातावरणात सकाळी आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्के इतके होते. पंचवटी, मेरी, म्हसरुळ या भागासह शहराच्या मध्यवर्ती परिसरात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. 

'लानिना'चा हवामानावर प्रभावसध्या हवामानाची स्थिती 'लानिना' स्वरुपाची बनली आहे. यामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञ सुनील काळभोर यांनी सांगितले. प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाण्याचे तापमानात घट होऊन अशी स्थिती तयार होते, असे त्यांनी सांगितले. सध्या हवामानावर ह्यलानिनाह्णचा होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज कायम आहे. दुपारनंतर शहरात अशाप्रकारे अचानकपणे दमदार सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काळभोर म्हणाले.नाशिकचे द्राक्षे संकटातमध्य, उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा सामना पुढील तीन दिवस करावा लागू शकतो. या बेमोसमी पावसाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसत आहे. द्राक्षांच्या घडांमधील मणी फुटत असल्याने द्राक्षबागायतदार धास्तावला आहे. एकुण नोव्हेंबरअखेरपासून हवामानाच्या बिघडलेल्या संतुलनामुळे यंदा नाशिकचे द्राक्षे मोठ्या संकटात सापडले आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा, गहूसारख्या पीकांच्या वाढीवरही दुष्परिणाम जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.-- 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसgodavariगोदावरी