शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळात १६, तर वृक्ष प्राधिकरणमध्ये सात सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:11 IST

महापालिकेच्या शिक्षण समितीत नऊ आणि वृक्ष प्राधिकरण समितीत केवळ दोन नगरसेवकांना सदस्य म्हणून नियुक्त करण्याचे प्रशासनाचे प्रस्ताव फेटाळत महासभेत महापौरांना सदस्य नियुक्तीचे स्वातंत्र दिले.

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण समितीत नऊ आणि वृक्ष प्राधिकरण समितीत केवळ दोन नगरसेवकांना सदस्य म्हणून नियुक्त करण्याचे प्रशासनाचे प्रस्ताव फेटाळत महासभेत महापौरांना सदस्य नियुक्तीचे स्वातंत्र दिले. तीन तास कायद्याचा कीस काढल्यानंतर अखेरीस शिक्षणमध्ये सोळा, तर वृक्ष प्राधिकरण समितीत सात नगरसेवक सदस्य नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गेल्या महासभेत तहकूब झालेल्या या दोन्ही समित्यांच्या नियुक्तीबाबत सोमवारी (दि.१९) झालेल्या वादळी चर्चेत हे निर्णय घेण्यात आले. यापूर्वी शिक्षण समितीत १६ ऐवजी ९ सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव मागे घेत प्रशासनाने सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे पत्र महासभेत दिले होते. मात्र, त्याबाबत घूमजाव करीत पुन्हा जुनाच प्रस्ताव मांडला होता.महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर महासभेने सोळा सदस्यांची शिक्षण समिती गठीत केली होती. दरम्यान, समितीएवेजी पूर्वीप्रमाणेच शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला होता. राज्य शासनाने तो नाकारला असला तरी तो विखंडित केला नव्हता.दरम्यान, प्रशासनाने प्रस्ताव मांडल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेने विषय समित्यांबाबत तयार केलेली नियमावली शासन संमत असून, त्यात बदल करायचे असल्यास सुधारित नियमावली शासनाकडे पाठवून ती मंजूर करावी लागेल त्यानंतरच कार्यवाही होईल, असे सांगितले. परंतु महापालिकेच्या अधिनियमात महासभेला वाटेल त्यानुसार समितीचा आकार ठरविता येईल असे नमूद केल्याचे गुरुमित बग्गा, उद्धव निमसे, दिलीप दातीर, सुधाकर बडगुजर यांनी सांगितले विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने शिक्षण समिती नियुक्तीबाबत स्थगिती दिली नाही, असे नमूद केलले. दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, शाहू खैरे, गजानन शेलार यांनीही हेच नमूद करताना महासभेच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला. अखेरीस १६ सदस्य नियुक्त करण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले.दोन अशासकीय सदस्य नियुक्तीचा प्रस्ताववृक्ष प्राधिकरण समितीत पुंडलिक गिते आणि बबन वाघ अशा दोन अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबराबेरच बीएस्सी झालेले दोन नगरसेवक नियुक्त करण्याचा प्रस्ताव होता. समिती आवश्यक आहे, परंतु बीएस्सी झालेल्या नगरसेवकांच्या संधीबाबत डॉ. हेमलता पाटील यांनी शंका उपस्थित केल्या. चंद्रकांत खाडे यांनीही चर्चेत भाग घेतला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक