शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आढळले १५३ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:13 IST

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून मंगळवारी (दि. २९) दिवसभरात शहरात ९७ तर ग्रामीणमध्ये ५२ असे जिल्ह्यात एकूण १५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच एकूण ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच २३५ रुग्ण मंगळवारी बरे झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ९७७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

ठळक मुद्दे७ रुग्णांचा मृत्यू : शहरात ९७ नवे रुग्ण, २३५ रुग्ण ठणठणीत बरे

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून मंगळवारी (दि. २९) दिवसभरात शहरात ९७ तर ग्रामीणमध्ये ५२ असे जिल्ह्यात एकूण १५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच एकूण ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच २३५ रुग्ण मंगळवारी बरे झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ९७७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात जरी असला तरी शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे अद्याप थांबलेले नाही. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणेदेखील तितकेच गरजेचे आहे. आगामी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा करण्याला नागरिकांनी यंदा फाटा देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सार्वजनिकरित्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.मंगळवारी दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात १५३ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची आतापर्यंतची रुग्णसंख्या १ लाख ९ हजार ४८८ वर पोहचली आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ४९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण १ हजार ९६२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर जिल्ह्यात सुमारे ९६.४० टक्के असून ही नाशिककरांना दिलासा देणारी बाब आहे. आतापर्यंत झालेल्या तपासणीतून ३ लाख १५ हजार १५१ नागरिक निगेटिव्ह आले आहेत. एकूण ३ हजार २४० अहवाल अद्याप प्रलंबित आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातून मंगळवारी १ हजार १९१ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. सध्या शहरात १ हजार २६८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. कोरोनाबाधित येण्याचा दर २५.५९ टक्के असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या