शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : नाशिकमधील जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुती कक्षाबाहेरुन सव्वा वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 19:24 IST

रुग्णालयीन व्यवस्थापनाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असता पाऊण वाजेच्या सुमारास एक अज्ञात पुरुष खांद्यावर चिमुकलीला घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसुन आले.

ठळक मुद्देमुलीचे अपहरण करणारा सीसीटीव्हीत कैदपोलिसांकडून दिवसभर शोधपाहुण्या आलेल्या महिलेने चिमुकलीला गमावले

नाशिक : आपल्या आईसमवेत जिल्हा शासकिय रुग्णालयात आलेल्या एका सव्वा वर्षाच्या चिमुकलीला अज्ञात पुरुषाने प्रसुती कक्षाबाहेरील बाकावरुन झोपलेल्या अवस्थेत उचलून घेत पोबारा केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास घडली. अपहरणकर्ता एका पायाने दिव्यांग असून मुलीला खांद्यावर टाकून रुग्णालयातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेवरुन पुन्हा एकदा रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्याअधारे शहर पोलिसांकडून दिवसभर सर्वत्र त्याचा शोध घेतला जात होता.जिल्हा शासकिय रुग्णालयात अंबड गावातील एका परप्रांतीय गौड कुटुंबातील दोन महिला शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आल्या. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर गर्भवती मनीषा गौड यांना घेऊन त्यांची दुसरी बहीण (अपहृत मुलीची आई) पहिल्या मजल्यावरील प्रसुती कक्षाजवळ आली. यावेळी तिने कक्षाबाहेर असलेल्या बाकावर आपल्या तान्हुलीला हातातील पिशवी अंथरवून झोपविले आणि तिच्या बहीणीला तपासणीसाठी कक्षात घेऊन गेली. काही वेळेत ती पुन्हा कक्षाबाहेर आली असता तेथील बाकावर झोपविलेली चिमुकली नजरेस पडली नाही. त्या मातेने संपुर्ण मजल्यावर भटकंती करत शोधाशोध केली. तसेच कक्षाबाहेर असलेल्या महिला सुरक्षारक्षकाच्याही ही बाब लक्षात आणून दिली आणि तत्काळ मजल्यावरुन खाली धाव घेत रुग्णालयाबाहेरील आवारात शोध घेण्यास सुरुवात केली. कोठेही चिमुकली आढळून न आल्यामुळे तिने रडारड सुरु केली.

यावेळी रुग्णालयीन व्यवस्थापनाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असता पाऊण वाजेच्या सुमारास एक अज्ञात पुरुष खांद्यावर चिमुकलीला घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसुन आले. चिमुकलीच्या मातेला हे चित्रीकरण दाखविण्यात आले असता तिने ही आपलीच मुलगी असल्याचे ओळखले; मात्र तीला घेऊन जाणारा पुरुष हा तिचा कोणीही नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती नसल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर तत्काळ नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्रणेवरुन माहिती देत शहरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गस्तीवरील पथकांना 'ॲलर्ट' करण्याच्या सुचना दिल्या.-
 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयKidnappingअपहरणhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी