शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

विकासासाठी १५ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:43 IST

मुंबईत बैठक : येवल्याच्या नगराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे वला : शहरातील रखडलेल्या भूमिगत गटार योजनेला चालना द्या किंवा नव्याने मंजुरी द्यावी. तसेच शहरातील नववसाहतीतील रस्ते, सोलर एलएडी पथदीप आदी विकासकामांसाठी १५ कोटींवर निधीची मागणी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठीचे सर्व प्रस्तावदेखील नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आले आहेत.

मुंबईत बैठक : येवल्याच्या नगराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

येवला : शहरातील रखडलेल्या भूमिगत गटार योजनेला चालना द्या किंवा नव्याने मंजुरी द्यावी. तसेच शहरातील नववसाहतीतील रस्ते, सोलर एलएडी पथदीप आदी विकासकामांसाठी १५ कोटींवर निधीची मागणी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठीचे सर्व प्रस्तावदेखील नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आले आहेत.राज्यात भाजपाची सत्ता असलेल्या ३१ नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची बैठक मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात घेतली. विकासकामांना निधी मिळत नसल्याच्या तक्र ारी होत असल्याने ही बैठक घेतल्याचे सांगितले जाते. या बैठकीला क्षीरसागर यांच्यासह मुख्याधिकारी दिलीप मेनकर हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, सचिव मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरे हगणदारीमुक्त करण्याच्या सुचना देऊन वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांवर भर देण्यास सांगितले. पालिकांना विकासासाठी भरीव निधी दिला जाईल. अधिकारी पदाधिकारी यांनी शॉर्टकट न शोधता नियमात राहून वेगाने कामे करावे लागतील, मात्र कामांची गुणवत्ता सांभाळावी लागेल,अन्यथा कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे सांगितले.यावेळी म्हैसकर यांनी पालिका निहाय आढावा सादर करत शहरातील स्वच्छतेच्या कामावर कटाक्ष टाकला. ५० टक्यांहून अधिक काम झाल्याचे सांगत यावर अधिक भर देण्याच्या सुचना केल्या. शहरात साकारल्या जाणाºया तात्या टोपे स्मारकासाठी ४ कोटीचा निधी गेल्या दीड वर्षापासून प्राप्त असून त्यासाठी पालखेड वसाहतीची जागा उपलब्ध करु न द्यावी, असा प्रस्ताव पालिकेच्या वतीने देण्यात आला.पालिका कर्मचाºयांना वेतन अनुदान अपुरे पडत असल्याने दरमहा १० लाख रुपये सहाय्यक अनुदान वाढवण्याची मागणी करण्यात आली. शहरातील नववसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने नागरीकांची रस्ता दुरु स्तीची अनेक वर्षाची मागणी आहे. त्यामुळे ५ कोटी रु पयांचा रस्ता निधी देण्यात यावा. हरीत पट्टा क्षेत्र विकास,व शहरात एलईडी दिवे बसवणे या कामासाठी १ कोटीचे अनुदान द्यावे. तसेच संपूर्ण गावात सोलर एलएडी बसविण्यासाठी २ कोटीच्या अनुदानाची मागणही यावेळी पालिकेच्या वतीने क्षीरसागर यांनी केली. शहरातील भुयारी गटार योजना रखडली असल्याने त्याला चालना देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, ती योजना बदलल्याने भुमिगत गटारीसाठी नव्याने प्रस्ताव देण्याच्या सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. याशिवाय आमरधामचे नुतणीकरण करणे, शहरात अद्ययावत व्यायामशाळा उभारणे, पालिकेसाठी अद्ययावत फायरफायटर देण्यात यावे, नगरपालिका कार्यालयाचे कामकाजाच्या दृष्टीने सुशोभीकरण करण्यात यावे, आदी मागण्यांचे प्रस्ताव देखील देण्यात आले आहे.भुमिगत गटार योजनेसह आवश्यक असलेल्या सगळ्याच विकास कामांचे प्रस्ताव दिलेले असून ते मार्गी लावण्यासाठी यापुढे माझ्यासह उपनगराध्यक्ष सुरज पटणी व सर्व नगरसेवक, अधिकाºयांच्या मदतीने पाठपुरावा करणार आहे.शहरातील अनेक रस्ते व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही निधीची मागणी केली आहे. पालिकेसह राज्यात सत्ता असल्याने सत्ताधारी म्हणून नागरिकांची अपेक्षा जास्त आहे.मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आमची भुमिका समजुन घेत विकास कामांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.- बंडू क्षीरसागर, नगराध्यक्ष येवला