शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदानासाठी १५ पर्यंत अर्जाची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:38 IST

कृषी उत्पन्न बाजार समित्या तथा उपबाजार तथा खासगी आवारात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे दोन लाख आठ हजार शेतकºयांना १५ जानेवारीपर्यंत संबंधित बाजार समित्यांमध्ये अर्ज सादर करण्याची मुदत असल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी सोमवारी (दि.३१) पत्रकार परिषदेत दिली आहे.

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्या तथा उपबाजार तथा खासगी आवारात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे दोन लाख आठ हजार शेतकºयांना १५ जानेवारीपर्यंत संबंधित बाजार समित्यांमध्ये अर्ज सादर करण्याची मुदत असल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी सोमवारी (दि.३१) पत्रकार परिषदेत दिली आहे.राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच खासगी बाजार समित्यांमध्ये १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रतिक्लिंटल दोनशे रुपये अनुदान मंजूर करण्याचानिर्णय शासनाने घेतलेला आहे. या कालावधीत नाशिक जिल्ह्णातील १७ बाजार समित्यांपैकी १५ बाजार समित्यांसह सुमारे २९ उपबाजार आवारात कांद्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहे.  जवळपास दोन लाख आठ हजार शेतक ºयांनी नोव्हेंबर महिन्यात १८ लाख ९३ हजार ८८७.५४ क्विंटल व त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत १७ लाख १२००४. ७९ क्लिंटल कांद्याची विक्री केली आहे. या सर्व कांदा उत्पादक शेतकºयांना अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे. परंतु एका शेतकºयांला २०० क्विंटलपर्यंतच कांद्याच्या विक्रीवर अनुदान मिळणार असून त्यापेक्षा अधिक कांद्यावर बसलेली झळ मात्र शेतकºयांना सोसावी लागणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकºयांना संबंधित बाजार समित्यांमध्ये नि:शुल्क अर्ज उपलब्ध करून देण्यांच्या सूचनाही करण्यात आल्याचे गौतम बलसाणे यांनी सांगितले.इन्फो-१अर्ज करण्याची प्रक्रिया अशीअनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकºयांना बाजार समिती अथवा खासगी बाजारात कांदा विक्री पट्टीची मूळ पावती, पिकपेºयात कांदा लागवडीचा उल्लेख असलेल्या ७/१२ उतारा आवारात, राष्ट्रीयीकृ त बँक, जिल्हा सहकारी बँक, खासगी बँक अशा ज्या बँके त शेतकºयाचे खाते आहे, त्या बँके तील पासबुकच्या पहिल्या पानाची खाते क्रमांक व आयएफएससी संके तांक असलेली प्रत आणि आधार कार्डसह विहित नमुण्याची अर्ज संबंधिक बाजार समितीत १५ जानेवारीच्या आत सादर करावे लागणार आहे.इन्फो-१अंंमलबजावणीसाठी दोन समित्याकांदा विक्रीवर शेतकºयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर दोन समित्या स्थापन करण्यात आल्या असून, तालुका सहायक निबंधक यांच्या अध्यक्षतेत तालुका लेखा परीक्षक सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव सदस्य सचिव म्हणून काम करताना पात्र शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी करून जिल्हा समितीकडे पाठवतील. त्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेत जिल्हा विशेष लेखापरीक्षक सदस्य व सहायक निबंधक (प्रशासन) सदस्य सचिव यांनी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून काम करताना जिल्ह्णातील पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य पणन संचालनालयाने केल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा