पिंपळगाव बसवंत : शहरात गेल्या चार दिवसांत १४१ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या १७३ झाली आहे, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. तरीदेखील पिंपळगाव शहरात दरदिवशी मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनाही जीव मुठीत धरून ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी व ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.चौकट...बुधवार ३७ रुग्णगुरुवार २३ रुग्णशुक्रवार ४७ रुग्णशनिवार ३४ रुग्णचार दिवसांत एकूण १४१ रुग्ण
पिंपळगाव शहरात चार दिवसांत १४१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:12 IST
पिंपळगाव बसवंत : शहरात गेल्या चार दिवसांत १४१ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या १७३ झाली आहे, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पिंपळगाव शहरात चार दिवसांत १४१ रुग्ण
ठळक मुद्दे ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत.