शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे १४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:58 IST

दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका शहरी भागात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी दिली.

नाशिक : दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका शहरी भागात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी दिली. गेल्या तीन महिन्यांमध्ये जिल्ह्यात १४७ रुग्ण आढळून आले असून, १४ जणांचा यात मृत्यू झाला आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने या वातावरणातही एच वन, एन वनचे विषाणू कार्यरत होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी वैयक्तिकरीत्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर देकाटे यांनी सांगितले की, दिवसाचे तापमान व रात्रीच्या तापमानामध्ये कमालीची तफावत आढळून येत आहे. या परिस्थितीमध्ये एच वन, एन वन (स्वाइन फ्लू) या आजाराची रु ग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता असते.आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागांमधून एच वन, एन वनसदृश १४७ रु ग्ण आढळून आलेले आहेत व आजपर्यंत १४ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सदर रु ग्णाचे प्रमाण हे शहरी भागांमध्ये जास्त आढळून येत असल्याने स्वत:ची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. ताप, सर्दी, घसादुखी, पडसे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास अंगावर न काढता डॉक्टरांकडून तपासून उपचार घेणे गरजेचे असल्याचे देकाटे यांनी सांगितले. आजारी व्यक्तीने गर्दीमध्ये मिसळू नये तसेच सर्दी-पडसेची लक्षणे आढळून आल्यास शिंकताना खोकताना रु मालाचा वापर नियमितपणे करावा तसेच आहार चांगल्या पद्धतीने घेण्यात यावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आराम करावा, लहान मुलांना उबदार कपड्यांमध्ये ठेवावे त्यांना वेळीच दवाखान्यात दाखवून उपचार करून घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.काळजी घेण्याचे आवाहनया आजारावरील औषधे टॉमी फ्लू सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रु ग्णालय येथे उपलब्ध असून संशय वाटल्यास त्वरित संबंधित आरोग्य संस्थेमध्ये जाऊन उपचार करून घेण्यात यावे, सामाजिक समारंभ, जत्रा, शाळा, वसतिगृहे या ठिकाणी हे आजार वेगाने पसरतात त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.या आजारांमध्ये ताप येणे, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी आणि जुलाबाची लक्षणे अशी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन उपचार करून घेण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूNashikनाशिक