कोरोना संकटामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून एमपीएससी व यूपीएससी परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. वाढत्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा आता घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२० अशाच प्रकारे पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा शनिवारी (दि. ४) सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण २२ हजार ४१९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांच्यासाठी ५८ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात १४ हजार ९३२ उमेदवारच परीक्षेसाठी हजर होते. तर ७ हजार ४८७ जण गैरहजर होते. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच वर्गखोलीत सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत परीक्षा घेण्यात आली.
५८ केंद्रांवर १४ हजार ९३२ उमेदवारांनी दिली एमपीएससी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST