शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

पेठरोडला १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग

By admin | Updated: June 2, 2014 00:30 IST

संशयित पसार : पोलीसात गुन्हा दाखल

संशयित पसार : पोलीसात गुन्हा दाखल पंचवटी : पेठरोडवरील नवीन मार्केट यार्ड परिसरातील मक्यातील शेतात भरदिवसा एका १३ वर्षीय मुलीवर नराधमाने जबरीने अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठरोडवरील झोपडप˜ीत राहणारी १३ वर्षीय बालिका ही काल दुपारी नवीन बाजारसमितीलगत असलेल्या शेतात गवत आणण्यासाठी गेली असता संशयिताने तिला तु माझ्या समवेत गवत आणण्यासाठी पुढे चल असे सांगितले व परिसरातील मक्याच्या शेतात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला त्यानंतर संशयिताने पलायन केले. सदर घटना घडल्यानंतर पिडीत मुलीने सदरचा प्रकार तिच्या कुटूंबियांना सांगितला त्यानंतर कुटूंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडला प्रकार पोलीसांना सांगितला व पिडीत मुलीच्या तक्रारीनुसार पोलीसात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जबरीने अतिप्रसंग करून संशयित पसार झाल्याने संशयिताचा शोध घेण्यासाठी पंचवटी पोलीसांना कसोटी करावी लागणार आहे. (वार्ताहर) उशिराने गुन्हा दाखलकाल दुपारच्या सुमाराला पेठरोडवरील तेरा वर्षीय मुलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. या घटनेनंतर स्वत: पिडीत मुलीने पोलीसात धाव घेतली होती. घटना घडल्यानंतर सात ते आठ तासांचा कालावधी लोटल्यानंतर पंचवटी पोलीसात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीसांच्या कामकाजाविषयी तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे. घटना घडल्यानंतर सदर मुलीच्या तक्रारीवरून तत्काळ गुन्हा दाखल करून घेणे गरजेचे असतांना पंचवटी पोलीसांनी उशिराने गुन्हा का दाखल केला याचे कारण गुलदस्त्याच आहे. दरम्यान एकीकडे घटना घडल्याच्या वृत्ताला पोलीसांनीच दुजोरा दिला असला तरी दुसरीकडे रात्री पोलीसच कोणतीही नोंद नसल्याचे सांगत होते.