शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
3
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
4
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
5
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
6
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
7
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
9
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
10
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
11
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
12
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
13
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
14
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
15
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
16
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
17
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
18
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
19
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
20
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

बिबट्याला पकडण्यासाठी लावले १३ पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:43 IST

दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे तीनवर्षीय बालकावर हल्ला करत पसार झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात ठिकठिकाणी सुमारे १३ पिंजरे लावले असून, ८० हून जास्त वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देग्रामस्थांचे शिष्टमंडळ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार

दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे तीनवर्षीय बालकावर हल्ला करत पसार झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात ठिकठिकाणी सुमारे १३ पिंजरे लावले असून, ८० हून जास्त वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.परमोरी येथे सोमवारी सायंकाळी बिबट्याने सार्थक ज्ञानेश्वर दिघे या तीनवर्षीय बालकावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. वनविभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. मंगळवारी सकाळी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी शिवबाला यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. मृत बालकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत उपाययोजना व सावधानता बाळगण्याच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. वनविभाग बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सर्वतोपरी उपाययोजना करेल, असे आश्वासन देत व वनअधिकाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिवबाला यांनी केले. यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वन कर्मचाºयांच्या तुकड्या परमोरीत हजर झाल्या. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी वनकर्मचाºयांनी पाहणी केली. परमोरी व परिसरातील वरखेडा, अवनखेड, लखमापूर, करंजवण, पिंपळगाव केतकी आदी परिसरात १३ पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी विविध ठिकाणी कॅमेरेही लावण्यात आले आहेत. दरम्यान, आमदार झिरवाळ यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधत बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करून उपाययोजना करावी, असे साकडे घातले. याबाबत विचार-विनिमय करून मार्ग काढण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असून, आमदार झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली परमोरी व परिसरातील वरखेडा, अवनखेड, लखमापूर, करंजवण, पिंपळगाव केतकी, म्हेळुस्के, ओझे, राजापूर, चिंचखेड, लोखंडेवाडी आदी गावांतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत.