भीम पगारे व्यावसायिक खंडणी प्रकरणनाशिक : व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या १३ संशयितांना न्यायाधीश जे़ जी़ पूनावाला यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ सराईत गुन्हेगार भीम पगारे याने हत्त्या होण्यापूर्वी १३ साथीदारांसह अपहरण करून खंडणी वसूल केल्याची फि र्याद व्यावसायिकाने भद्रकाली पोलिसांत दिली होती़ या संशयितांना न्यायालयात आणतेवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़पगारेची हत्त्या होण्यापूर्वी त्याने संशयित नीलेश सारंगधर धामोडे, प्रवीण ज्ञानेश्वर वाघ, योगेश मधुकर गरड, दिगंबर विठ्ठल नाडे, मिलिंद मनोहर भालेराव, धनंजय देवीदास गायवटे, पंकज रामदास मुर्तडक, तपन प्रकाश जाधव, प्रशांत ऊर्फ रामा अशोक सूर्यवंशी, अच्युत दत्तात्रय तुपे, राहुल उत्तमराव तागड, संतोष बालमोहन मिश्रा या १३ साथीदारांच्या मदतीने एका व्यावसायिकाला त्याच्या कुटुंबीयांना उचलून आणण्याची धमकी देत नानावली चौकात बोलावले़ त्याचे अपहरण करून त्याच्याकडे चार लाखांची खंडणी मागितली़ व्यावसायिकाने इतकी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर त्याला शस्त्राचा धाक दाखविण्यात आला होता़ तसेच पोलिसांकडे जाऊ नये यासाठी पाळतही ठेवण्यात आली़शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास व्यावसायिकाने ७० हजार रुपये भीम पगारे व त्याच्या साथीदारांना दिले़ उर्वरित रक्कम दोन-तीन दिवसांत आणून देण्याच्या बोलीवर त्याची सुटका करण्यात आली़ या घटनेनंतर काही वेळातच भीम पगारेची गोळ्या झाडून व धारदार हत्त्याराने वार करून हत्त्या झाली़ या घटनेनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने शनिवारी रात्री भद्रकाली पोलीस ठाण्यात मयत भीम पगारे व त्याच्या तेरा साथीदारांविरोधात फि र्याद दिली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी कॉल रेकॉर्डवरून संशयितांना अटक केली़ त्यांना आज न्यायालयात हजर केले असता १७ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्तखंडणी प्रकरणातील तेरा संशयितांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त संदीप दिवाण, अविनाश बारगळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, रमेश पाटील यांच्यासह प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ संशयितांजवळ एकही नागरिक येणार नाही याची पुरेपूर दक्षता पोलीस यंत्रणेने घेतल्याचे दिसून आले़
खंडणी प्रकरणातील १३ संशयितांना कोठडी
By admin | Updated: May 12, 2014 23:23 IST