शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या आठवड्यातच १२ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:32 IST

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्जन्यवृष्टी पहिल्याच आठवड्यात झाली आहे.

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात सर्व दूर लावलेली हजेरी व पाठोपाठ मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांत चांगलेच झोडपून काढल्याने अवघ्या काही दिवसांतच जून महिन्याच्या एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास १२ टक्के पर्जन्यवृष्टी पहिल्याच आठवड्यात झाली आहे. विशेष म्हणजे समाधानाची बाब म्हणून दुष्काळी ओळखल्या जाणाºया मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यांत तर या पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे.नाशिक जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान १५,००४ मिलीमीटर इतकी असून, त्यात जून महिन्याचे प्रमाण २७०४ मिलीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर जिल्ह्यात फक्त १ टक्केच पाऊस झाला होता. यंदा मात्र हेच प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतर मान्सूनच्या आगमनाकडे साºयांचे लक्ष लागून होते. तथापि, गुरुवार, शुक्रवारी पावसाने मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली आणि नाशिक, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेवर, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण, देवळा, सिन्नर, येवला या तालुक्यांना जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१५ मिलीमीटर पाऊस झाला.त्यातून जून महिन्याच्या एकूण सरासरीच्या १२ टक्के पाऊस नोंदविला गेला.या पावसामुळे मालेगावला ११४, बागलाणला १३८, देवळा १२२, सिन्नरला १२१ टक्के पाऊस झाला आहे. हे सारे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओेळखले गेले आहेत. आजवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी नोंदविला गेला असून, त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकºयांनी खरिपाच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे.---------------------------पावसाचे पाणी सोडून देण्याची वेळशुक्रवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर व धरण परिसरात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यातच दारणा धरण क्षेत्रातील पाणीही थेट नदीत येऊन मिसळल्याने गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. अशातच नांदुरमधमेश्वर बंधाºयात अगोदरपासूनच १०० टक्के पाणीसाठा असल्यामुळे शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी पहाटे ६ वाजेपर्यंत जवळपास तीनशेहून अधिक क्यूसेक पाणी सोडून देण्यात आले. हे पाणी पुढे नगर जिल्ह्याकडे झेपावले.

टॅग्स :Nashikनाशिक