नाशिक : कामटवाडे, अंबिकानगर परिसराचा वीजपुरवठा ऐन उन्हाळ्यात मंगळवारी (दि. ५) रात्री १०.३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत तब्बल १२ तास बंद राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील नारळाच्या झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी होत आहे. सिडकोसह उपनगर परिसरातील काही भागांत विजेचा लपंडाव सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. मात्र वीजपुरवठा सुरळीत असल्याचा दावा वीज वितरण कंपनीकडून केला जात आहे.
कामटवाडे परिसरात १२ तास विजेचा खेळखंडोबा
By admin | Updated: April 7, 2016 23:57 IST