शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘कळसुबाई’वर फडकणार १२ फूट अन् ६३ मीटर लांबीचा तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:15 IST

देशाचा तिरंगा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. बनसोडे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविला जाणार आहे.

ठळक मुद्देझेंड्याची उंची १२ फुट आणि लांबी ६३ मीटर ‘भंडारदरा टुरिझम’च्या लोगोचे अनावरण

नाशिक : महाराष्ट्रतील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील भंडारदरा येथील ‘कळसुबाई’ शिखरावर स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.१५) एव्हरेस्ट सर करणारा आदिवासी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्यांचे पथकाच्या प्रमुख उपस्थितीत सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकाविला जाणार असल्याची माहिती भंडारदरा पर्यटनाचे अध्यक्ष रवी ठोंबाडे यांनी दिली. यावेळी बनसोडे यांच्या हस्ते ‘भंडारदरा टुरिझम’च्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे.देशाचा तिरंगा आता कळसूबाई शिखरावर डौलाने फडकताना दिसणार आहे. बनसोडे यांनी स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविला जाणार आहे. या झेंड्याची उंची १२ फुट आणि लांबी ६३ मीटर असणार आहे, अशी माहिती विजया पाडेकर यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेत शेकडो लोक सामील होणार असून भारताच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब असणार आहे.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ‘360एक्सप्लोरर’च्या माध्यमातून जगभर मोहिमा करत असतात. बनसोडे यांनी जगातील ४खंडातील ४ सर्वोच्च शिखरांवर चढाई करून भारतासाठी अभिमानास्पद कामिगरी केली आहे. ते आपल्या टीमसोबत पहाटे पाच वाजता कळसूबाई शिखरावर चढाई सुरू करणार आहे. बनसोडे व ठोंबाडे यांनी अकोले तालुक्याचे निसर्गसौंदर्य अन् येथील गडकिल्ल्यांचे वैशिष्टय जगभर पोहचावे, यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. जेणेक रुन येथील आदिवासी बेरोजगार तरुणांना अधिकाधिक रोजगार मिळण्यास मदत होईल.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिकAhmednagarअहमदनगरtourismपर्यटनEverestएव्हरेस्ट