शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

येवला तालुक्यातील ११५ गावांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:16 IST

तालुक्यात ८९ ग्रामपंचायती असून, ग्रामपंचायतनिहाय विचार केला तर सर्वच ग्रामपंचायती बाधित असल्याचे दिसते. तालुक्यातील न्याहरखेडा खुर्द, कौटखेडा, दहेगाव ...

तालुक्यात ८९ ग्रामपंचायती असून, ग्रामपंचायतनिहाय विचार केला तर सर्वच ग्रामपंचायती बाधित असल्याचे दिसते. तालुक्यातील न्याहरखेडा खुर्द, कौटखेडा, दहेगाव धूळ, तांदुळवाडी, महालगाव, वसंतनगर, पिंपळखुटे खुर्द, देवदरी, पन्हाळसाठे ही ९ गावे कोरोनाच्या प्रकोपासून मात्र सुरक्षित राहिली आहेत. तर येवला शहरातील कोरोना संसर्गाची लाट मात्र आता ओसरल्याचे दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या बाधित रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. या लाटेत आत्तापर्यंत शहरातील २८, तर ग्रामीण भागातील ३०१ बाधितांचा बळी गेला आहे.

तालुक्यातील अंदरसूल, मुखेड, नगरसूल, पाटोदा, राजापूर, जळगाव नेऊर या प्रमुख गावांसह आडगाव चोथवा, आडगाव रेपाळ, आडसुरेगाव, आंबेगाव, अंगणगाव, अंगुलगाव, अनकाई, अनकुटे, सावखेडा, भारम, बाभूळगाव खुर्द, बाभूळगाव बुद्रुक, बाळापूर, कासारखेडे, वडगाव, बल्हेगाव, बोकटे, धानोरे, अंतरवेली, भाटगाव, भिंगारे, महालखेडा पाटोदा, महालखेडा चांदवड, भुलेगाव, चांदगाव, बदापूर, चिचोंडी, रायते, चिचोंडी बुद्रुक, भायखेडा, देवठाण, देशमाने बुद्रुक, देशमाने खुर्द, धामणगाव, धामोडे, देवरगाव, एरंडगाव बुद्रुक, गारखेडा, गवंडगाव, गणेशपूर, आहेरवाडी, जायदरे, लहित, हडपसावरगाव, कातरणी, खरवंडी, खिर्डीसाठे, कोटमगाव बुद्रुक, कोटमगाव खुर्द, कुसमाडी, कोळम खुर्द, खैरगव्हाण, भारम, कुसूर, ममदापूर, मानोरी, गोल्हेवाडी, मातुलठाण, मुरमी, नागडे, नायगव्हाण, नेऊरगाव, निळखेडे, निमगाव मढ, नांदूर, नांदेसर, पारेगाव, दहेगाव पाटोदा, पिंपळखुटे बुद्रुक, डोंगरगाव, पन्हाळसाठे, पिंपळखुटे तिसरे, पिंप्री, पिंपळगाव जलाल, पिंपळगाव लेप, पांजरवाडी, पुरणगाव, न्याहरखेडे बुद्रुक, रेंडाळे, साताळी, सातारे, सत्यगाव, सावरगाव, सायगाव, शिरसगाव लौकी, वळदगाव, जायदरे, सोमठाणदेश, सुरेगाव रस्ता, तळवाडे, विखरणी, विसापूर, वाईबोथी, कोळगाव, धुळगाव, कानडी, दुगलगाव, शेवगे, एरंडगाव खुर्द, रहाडी, ठाणगाव, खामगाव, गुजरखेडा, धनकवाडी, वाघाळे, जऊळके, देवळाणे, साबरवाडी या गावांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

अपुरी साधनसुविधा, औषध, लस, ऑक्सिजनचा तुटवडा याबाबी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही परिपूर्ण नाहीत. परिणामी कोरोना रोखण्यात प्रशासनाची दमछाक होते आहे.

इन्फो

...ही आहेत हॉटस्पॉट गावे

ग्रामीण भागातील नगरसूल, मुखेड, सायगाव, ममदापूर, निमगाव मढ ही गावे सद्य:स्थितीत कोरोना हॉटस्पॉट ठरली आहेत. ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाबळींचे प्रमाणही वाढते असल्याने प्रशासनाने ग्रामीण भागावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असून, लसीकरण केंद्रांवर लस मिळवण्यासाठी होणारी गर्दी संसर्गाला तर कारणीभूत ठरत नसावी, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. लस मिळवताना सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याचे नेहमीच दिसून येते.

फोटो- ०६ येवला लसीकरण

येवला उपजिल्हा रुग्णालय लसीकरण केंद्रावरील गर्दी.

===Photopath===

060521\06nsk_28_06052021_13.jpg

===Caption===

 फोटो- ०६ येवला लसीकरण येवला उपजिल्हा रूग्णालय लसीकरण केंद्रावरील गर्दी.