शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

११२ घरे भस्मसात, ६५० नागरिक बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:52 IST

गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान,आपादग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

ठळक मुद्देमनपाकडून पंचनामा : नुकसानभरपाईबाबत आज निर्णय

नाशिक : गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान,आपादग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.गंजमाळ हा शहराच्या मध्यवस्तीतील रहिवासी भाग असून, दाट वस्तीच्या या भागात शनिवारी (दि.२५) अचानक आग लागली. अनेक घरांत सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि आग आटोक्यात आणली. मात्र, त्यानंतरही अनेक घरे भस्मसात झाली, तर साडेसहाशे नागरिक बेघर झाले आहे. एकापाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतरदेखिल जीवितहानी टळली ही या दुर्घटनेत सुदैवाची बाब ठरली.दरम्यान, आगीच्या घटनेनंतर महापालिकेने संबंधित विस्थापित नागरिकांची जवळच्याच बी. डी. भालेकर मैदान आणि मनपा शाळा क्रमांक सहामध्ये व्यवस्था केली. याशिवाय रविवारची सुटी असल्याने शनिवारीच घाईघाईने सर्व पंचनामे उरकण्यात आले. त्यानुसार ११ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, ६५० नागरिक बेघर झाल्याचा अहवाल सायंकाळी तयार करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करून या नागरिकांनातातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. दरम्यान रविवारी या नागरिकांना विविध संस्थांतर्फे मदत देण्यात आली.भीमवाडी आणि महापालिकेचे अग्निशमन दलाचे कार्यालयातील अंतर अत्यंत कमी असतानादेखील अग्निशमक दलाचे बंब वेळेत पोहोचले नाहीत, त्याचप्रमाणे संपूर्ण आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजू देसले यांनी केली आहे, तर याठिकाणी झोपडपट्टी घोषित करण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी तसेच अर्धवट स्थितीत असलेली महापालिकेची घरकुल योजना पूर्ण करावी, अशी मागणी शेकापचे अ‍ॅड. मनीष बस्ते यांनी केली आहे.

टॅग्स :fireआग