शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ‘अ‍ॅप’वर  पंधरा दिवसांत ११०० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:44 IST

महापालिकेने यापूर्वीच्या ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅपला गुडबाय करत नव्याने तयार केलेल्या ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नवीन अ‍ॅपवर १५ दिवसांत ११०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित आहेत. ११०९ पैकी ८५१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपबाबत ६९ टक्के नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे‘स्मार्ट नाशिक’चे फिचर्स बंदअ‍ॅपबाबत ६९ टक्के लोकांनी तक्रार निवारणाबाबत समाधान व्यक्त केले११०९ तक्रारींमध्ये सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाच्या

नाशिक : महापालिकेने यापूर्वीच्या ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅपला गुडबाय करत नव्याने तयार केलेल्या ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नवीन अ‍ॅपवर १५ दिवसांत ११०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित आहेत. ११०९ पैकी ८५१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपबाबत ६९ टक्के नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  नाशिक शहराचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश होण्यासाठी २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘स्मार्ट नाशिक’ या अ‍ॅपची निर्मिती केली होती. सुमारे ५५ हजारहून अधिक नागरिकांनी हे अ‍ॅप डाउनलोड करून घेतले होते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ तक्रार निवारणासाठी सदर cघेतला. त्यानुसार, सुधारणा करत दि. १ मार्चपासून ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नावाने अ‍ॅप तयार करण्यात आले. सदर अ‍ॅपवर पंधरा दिवसांत ११०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यातील ८५१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. २५८ तक्रारी प्रलंबित आहेत. या अ‍ॅपबाबत ६९ टक्के लोकांनी तक्रार निवारणाबाबत समाधान व्यक्त केले आहे, तर १७ टक्के लोकांनी फिडबॅक दिला आहे. आतापर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांनी सदर अ‍ॅप डाउनलोड करून घेतले आहे. प्राप्त तक्रारींपैकी १२ तक्रारींचे निवारण सात दिवसांच्या आत न झाल्याने संबंधित खातेप्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ११०९ तक्रारींमध्ये सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाच्या आहेत. त्यापाठोपाठ अतिक्रमण १७८, रस्ते बांधकाम-१५३, अस्वच्छता-१४१, पाणीपुरवठा- १०५, उद्यान-७६, आरोग्य-७४, तर ड्रेनेज विभागाच्या ७० तक्रारींचा समावेश आहे.‘स्मार्ट नाशिक’चे फिचर्स बंदमहापालिकेने नवीन ‘एनएमसी ई-कनेक्ट’ हे अ‍ॅप सुरू केल्याने जुन्या असलेल्या ‘स्मार्ट नाशिक’अ‍ॅपचे सर्व फिचर्स येत्या रविवार (दि.१८)पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, नागरिकांना नवीन मोबाइल अ‍ॅपवर आपल्या तक्रारी मांडता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका