र्यंबकेश्वर : श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर श्री श्री १००८ महामंडलेश्वर अवधूत बाबा अरुण गिरी अर्थात गोल्डन बाबा, विश्व यज्ञ पर्यावरण ट्रस्ट व ब्रम्हा व्हॅली शैक्षणिक ट्रस्टच्या सहयोगाने येथे १०८ यज्ञकुंडामध्ये शिवशक्ती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञानाला रविवारी (दि.२३) प्रारंभ झाला असून, हा सोहळा पाच दिवस चालणार आहे. त्यासाठी येथे एक यज्ञ मंडप व त्याच्या शेजारीच भव्य शामियानाही उभारण्यात आला आहे. तत्पूर्वी रविवारी महाराजांची शहरातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री जिनल पंड्या, वैजापूर येथील बॅण्ड पथक आणि मुंबईतील तुतारी लेजीम पथकाने लक्ष वेधले. आखाड्याच्या साधू-महंतांसमवेत ब्रह्मा व्हॅलीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
१०८ यज्ञकुंडात पाच दिवस शिवशक्ती महायज्ञत्
By admin | Updated: August 23, 2015 23:28 IST