शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रेमडेसिविर वापरण्यास १०५ रूग्णालयांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी मानल्या गेलेल्या रेमडेसिविरचा वापर गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी झाला असून, काेरोना रूग्णांची कमी होत असलेली संख्या व दुसऱ्या टप्प्यातील काेरोना लाटेवर रेमडेसिविरची मात्रा कामी येत नसल्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे रेमडेसिविरचे महत्त्व कमी झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०५ रूग्णालयांनी गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरची मागणीदेखील केलेली नाही. कोरोनानंतर उद्भवणाऱ्या आजारांमध्ये रेमडेसिविरचा वारेमाप वापरदेखील कारणीभूत असल्याचे त्याचबरोबर म्युकरमायसोसिससारख्या गंभीर आजाराचे वाढत असलेले प्रमाण पाहता, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत आता डॉक्टरांकडूनही काळजी घेतली जात असल्याने रेमडेसिविरचे महत्त्व कमी झाल्याचे मानले जात आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरली. रूग्णांची संख्या वाढल्याने रूग्णालये अपुरे पडू लागली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. अत्यवस्थ व गंभीर रूग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविरची एकमेव मात्रा उपयोगी पडत असल्याचे पाहून सर्वच रूग्ण व रूग्णालयांसाठी रेमडेसिविरचा आग्रह धरला गेला. त्यामुळे रेमडेसिविरची मागणी वाढून काळाबाजारही सुरू झाला. एकेका इंजेक्शनसाठी रूग्णांचे नातेवाईक औषधाच्या दुकानांबाहेर चौदा ते सोळा तास रांगेत ताटकळले. या इंजेक्शनची मात्रा काही रूग्णांना कामीही आली व अनेकजण कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरीही गेले. परंतु, दुसऱ्या लाटेत बरे झालेल्या अनेक कोरोना रूग्णांना नंतर अनेक व्याधी जडल्याचे समोर येत असून, म्युकरमायसोसिस हा गंभीर आजार त्यातला एक भाग असल्याचे मानले जात आहे. दिल्लीस्थित आरोग्य विभागानेदेखील रेमडेसिविरच्या दुसऱ्या लाटेतील वापराबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कोरोनावर उपचार करणाऱ्या रूग्णालयांकडून रेमडेसिविरचा वापर अचानक कमी करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसात दररोज रेमडेसिविरच्या मागणीत घट झाली असून, रूग्णालयांनी त्याचा वापर करण्यास नकार दिला आहे. रेमडेसिविरची मागणी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर नोंदवावी लागते. त्यात रूग्णालयाची बेडची संख्या व त्यांना प्रदान करण्यात आलेल्या डोसची माहिती जाहीर केली जात असून, अनेक रूग्णालयांनी आपल्याकडील रूग्णांची माहिती प्रशासनाला देण्यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी आठ ते दहा हजारांची मागणी असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आता तीनशे ते चारशेच्या घरात आली आहे.

चौकट==

रेमडेसिविरच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने बुधवार (दि. १९) रोजी ७५२ रेमडेसिविरची मात्रा जिल्ह्याला प्राप्त झाली. मात्र, ११७ रूग्णालयांनी त्यांची मागणी नोंदवलीच नाही. हेच प्रमाण शुक्रवार (दि. २१) रोजी कायम राहिले. अवघ्या ३०१ रेमडेसिविरची मागणी नोंदविण्यात आली व ७५ रूग्णालयांनी त्यांची मागणीच नोंदवलेली नव्हती. तर शनिवार (दि. २२) रोजी ४८१ रेमडेसिविर प्राप्त झाली, त्याचवेळी १०५ रूग्णालयांनी ही मात्रा घेण्यास नकार दिला आहे.