शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणात १०१ टक्केसाठा : पाणीप्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:02 IST

: गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात लावलेली दमदार हजेरी व त्यानंतरही अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गंगापूर धरण १०१ टक्के भरले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात शंभर टक्केपाणी साठल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला असून, भविष्यात पावसाचा भरवसा देता येत नसल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून सुटणाºया पाण्याला ब्रेक लावला आहे.

नाशिक : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात लावलेली दमदार हजेरी व त्यानंतरही अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गंगापूर धरण १०१ टक्के भरले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात शंभर टक्केपाणी साठल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला असून, भविष्यात पावसाचा भरवसा देता येत नसल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून सुटणाºया पाण्याला ब्रेक लावला आहे.  आॅगस्ट महिन्यात जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावरच सारी मदार ठेवण्यात आली होती. जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात तुफान झालेल्या पावसामुळे धरणात ७० टक्के जलसाठा झाल्यावर पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याची कार्यवाही केली. परिणामी गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. असाच प्रकार दारणा धरणाच्याबाबत घडल्यामुळे तेथूनही मोठा विसर्ग करण्यात आल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी २२ टीएमसी पाणी पोहोचले. परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही जेमतेम साठा असल्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु शेवटच्या आठवड्यात पावसाचे धुवाधार पुनरागमन झाल्याने गंगापूर धरण पाणलोट क्षेत्राचा लाभ धरण समूहाला झाला.  अजूनही त्र्यंबकेश्वर, आंबोली या भागात पावसाची कमी अधिक हजेरी असल्यामुळे गंगापूर धरण १०१ टक्के भरले तर या धरण समूहातील कश्यपी ९९, गौतमी गोदावरी ९८ व आळंदी धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गंगापूर धरणात ९४ टक्के, तर समूहात ९६ टक्केजलसाठा होता.जिल्ह्यातील धरणे  झाली फुल्लजिल्ह्यातील आठ धरणे शंभर टक्केफुल्ल झाली असून, जवळपास सर्व धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा झाला आहे. शंभर टक्केभरलेल्या धरणांमध्ये गंगापूर, आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझरचा समावेश आहे. त्यातील गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, चणकापूर या धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील धरणे ८५ टक्के भरली होती.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणRainपाऊस