शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 01:58 IST

सिन्नर: व्यावसायिक  रावसाहेब आढाव यांनी आपल्या आई  वडिल यांचे स्मृती प्रित्यर्थ सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स, सॅनेटायझर फवारणी पंप तर माध्य. विद्यामंदिर,सरदवाडी शाळेस उच्च दर्जाची टेंपरेचर गन भेट म्हणून दिली.

ठळक मुद्देळेस उच्च दर्जाची टेंपरेचर गन भेट म्हणून दिली.

सिन्नर: व्यावसायिक  रावसाहेब आढाव यांनी आपल्या आई  वडिल यांचे स्मृती प्रित्यर्थ सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स, सॅनेटायझर फवारणी पंप तर माध्य. विद्यामंदिर,सरदवाडी शाळेस उच्च दर्जाची टेंपरेचर गन भेट म्हणून दिली.

मातृ देवो भव, पितृ देवो भव. हे सुभाषित आचरणात आणत आहे, त्याप्रमाणे वर्तन करीत आहे, इतकच. आई-वडिलांनी केलेले संस्कार, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून मी वाटचाल करीत आहे, त्यामुळेच जीवनात यशस्वी होऊ शकलो. दरवर्षी आई-वडिलांच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून, आपल्या आई-वडिलांना प्रती आदर व्यक्त करावा, त्यांची आठवण तुमच्या सगळ्यांसोबत काढावी म्हणून आपल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व मातोश्री चं. व अ. चांडक कन्या विद्यालय विद्यार्थ्यांचे पालक व यशस्वी व्यावसायिक  रावसाहेब आढाव यांनी आपल्या आई  वडिल यांचे स्मृती प्रित्यर्थ सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 1000 मास्क, शिक्षकांसाठी एन 95चे 60 मास्क, सॅनेटायझर कॅन्स, सॅनेटायझर फवारणी पंप तर माध्य. विद्यामंदिर,सरदवाडी शाळेस उच्च दर्जाची टेंपरेचर गन भेट म्हणून दिली.रावसाहेब आढाव यांनी पुढे आपल्या मनोगतातून सांगितले की, आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती पण आई वडिलांनी अतिशय काबाड कष्ट करून आम्हा भावंडांना वाढवले, चांगले संस्कार आमच्यावर केले, स्वतःच्या हौस मौज, आवड बाजूला ठेवून आम्हा भावंडांना चांगले शिकविले ,आई वडिलांची आठवण , तुमच्यासोबत काढावी ,म्हणून ही छोटीशी मदत करत आहे ,कारण आई-वडिलांनीच हा संस्कार आमच्यावर केला की आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतोय.ते कृतार्थ भावनेने नियमित देत रहावे.यावेळी मंचावर चांडक कन्या विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अ‍ॅडवोकेट श्रीराम क्षत्रिय, भाऊसाहेब आढाव,रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर चे अध्यक्ष महेश बोराडे, डॉ.भूषण वाघ, बाळासाहेब सदगीर ,सुनील भडांगे, भाऊसाहेब ढोने, प्रदीप दिवे, विनोद दंताळ, हे मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापिका सौ. माधवी पंडित यांनी प्रास्ताविक केले, पर्यवेक्षक सुनील हांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, पर्यवेक्षक चंद्रभान कोटकर यांनी आभार मानले. सौ. दुसाने यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल मुळे, कांतीलाल कासार,योगेश कुलकर्णी, गणपत बेझेकर यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या