शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटी वृक्षलागवड योजना कागदावरच

By admin | Updated: June 29, 2014 00:48 IST

१०० कोटी वृक्षलागवड योजना कागदावरच

 

शफीक शेख

मालेगावराज्यात पावसाने वक्रदृष्टी केल्याने शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरण्याच होऊ शकलेल्या नाहीत. त्यात राज्य शासनाच्या वनविभागातर्फे शंभर कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला असला तरी, पावसाअभावी ही वृक्षलागवड अद्याप सुरूच झालेली नाही.गेल्या वर्षापासून प्रत्येक वनविभागास रोपवन लागवडीखाली उद्दिष्ट दिले जाते. नाशिक जिल्ह्यात मालेगाव उपवन विभागात यावर्षी ३५४ हेक्टर क्षेत्रावर रोपवन लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पाऊस आल्यावर यावर्षी चार लाख रोपांची लागवड पावसाळ्यात करण्यात येणार आहे. मालेगाव तालुक्यात वनविभागातर्फे हाताणे, गाळणे, लुल्ले, हरणबारी, जाखोड, दोधेश्वर येथे वनविभागातर्फे रोपवाटिका तयार केल्या आहेत. त्यात साडेसहा लाख रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्रावर प्रत्येक बिटात नियत क्षेत्रात ५ हेक्टर प्रमाणे ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांमार्फत बीजारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.४राज्य शासनाने १३ मे २०१४ रोजी ग्रामवन घोषित करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार बागलाण तालुक्यातील केरोबानगर गावाची ग्रामवनासाठी निवड करण्यात आली असून, ग्रामवन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ४२५ हेक्टर क्षेत्रात रोपवन लागवड करण्याकरिता साडेतीन लाख रुपये खर्च येतो. वृक्षलागवडीसाठी व संगोपनासाठी शासनास ५० लाख रुपये खर्च येतो. गत वर्षात शंभर कोटी वृक्षलागवड ४३२ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली असून, सात लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपविभागीय वनाधिकारी दराडे यांनी दिली.४त्यात सुमारे ८० टक्के जिवंत रोपांची टक्केवारी आहे. शंभर कोटी वृक्षांची लागवड केल्याने पर्यावरण संतुलन राबवण्यासाठी त्याची मदत होणार असल्याने शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. एकंदरीत शासनाने वृक्षलागवडीवर लाखो रुपये खर्च करून शंभर कोटी वृृक्षलागवडीचा संकल्प केलेला असताना पावसाच्या लहरीपणामुळे ही वृक्षलागवडही अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे.