शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ओझर ग्रामपालिकेच्या निवडणुकीत १० जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:03 IST

ओझर : येथील नगरपरिषदेच्या उद्घोषणेनंतरही जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाने माघार घेतल्यामुळे नागरिक आघाडीच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर एकूण चार वॉर्डात सात जागांसाठी निवडणूक होणार आहे.

ओझर : येथील नगरपरिषदेच्या उद्घोषणेनंतरही जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या दिवशी माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाने माघार घेतल्यामुळे नागरिक आघाडीच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर एकूण चार वॉर्डात सात जागांसाठी निवडणूक होणार आहे.मागील महिन्यात चार डिसेंबर रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील १३ ग्रामपंचायतींची पदोन्नत्ती करण्याचे ठरविले होते. यात ओझर ग्रामपालिकेचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे ओझरची प्रशासकीय प्रक्रिया सर्वांत पुढे असताना निवडणूक आयोगाने त्या आधीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने न्यायालयाने कमी कालावधीसाठी का होईना, आपला निर्णय कायम ठेवला. सुरुवातीला दोन पॅनलमध्ये सरळ लढत दिसत असताना शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकूण पाच वॉर्डात दहा उमेदवार हे नागरिक आघाडीचे बिनविरोध निवडून आले आहेत, तर प्रभाग २, ४, ५ व ६ मध्ये सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.-------------------दिंडोरी पॅटर्नची आठवण२०१५ मध्ये दिंडोरी ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तेथील सर्वच नागरिकांनी ग्रामपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे लगेच सहा महिन्यांत शासनाने प्रक्रिया गतिमान केली व नगरपंचायत अमलात आली. ओझरच्या बाबतीत मात्र अनिल कदम गटाने माघार घेत थेट नगरपरिषद निवडणुकीत उतरण्याचे ठरवल्याने यतीन कदम गटाचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले तर एका गटाने रिंगणात कायम राहण्याचा ठाम पवित्रा घेतला.--------------येत्या दोन महिन्यांत होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीमुळे मतदारांना संभ्रमात न ठेवता शिवसेना ताकदीनिशी उतरणार आहे. गावातील जनतेने माघारीमुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. घोषणेनंतर हरकतीचा कालावधी संपल्याने नगरपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.-अनिल कदम, माजी आमदार