इगतपुरी : रुग्णांचा ऑक्सिजन तपासण्यासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिमिटर संख्या कमी पडत असल्याचे समजताच किसान सभेचे तालुकाध्यक्ष मदन चोरडिया यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सिमीटर भेट दिले.वैद्यकीय अधीक्षिका डॉ. स्वरुपा देवरे यांनी रुग्णालयात जनरेटर व संगणक संचाची गरज असल्याचे सांगताच चोरडिया यांनी त्यांना काही दिवसांतच संच उपलब्ध करून देऊ असे सांगितले. केवळ सामाजिक दृष्टिकोन व मानवसेवा ह्या जाणीवेतून ही मदत करत असल्याचे चोरडिया यांनी सांगितले.यावेळी जगदीश मंत्री, खंडेराव नाठे, आकाश चोरडिया, अनंत पासलकर, विशाल आदमाने, नगरसेवक दिनेश कोळेकर, सुरक्षा सेवक रामदास आवारी, पिंटू धांडे, सचिन म्हसणे, राकेश निरगुडे, प्रयोगशाळा व्यवस्थापक संजय वाणी, प्रशांत बाविस्कर आदी उपस्थित होते.
रुग्णालयाला १० ऑक्सिमीटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:49 IST
इगतपुरी : रुग्णांचा ऑक्सिजन तपासण्यासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिमिटर संख्या कमी पडत असल्याचे समजताच किसान सभेचे तालुकाध्यक्ष मदन चोरडिया यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सिमीटर भेट दिले.
रुग्णालयाला १० ऑक्सिमीटर भेट
ठळक मुद्देरुग्णालयात जनरेटर व संगणक संचाची गरज