शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यात आढळल्या १० मृत पाणकोंबड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:44 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथील तलावात दहा पाणकोंबड्या व एक बगळा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्यबर्ड फ्लह्ण च्या पार्श्वभूमीवर अकरापक्षी मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पशुधन खात्याच्या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदातली : परिसरात खळबळ ; बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सतर्कता

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथील तलावात दहा पाणकोंबड्या व एक बगळा मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्यबर्ड फ्लह्ण च्या पार्श्वभूमीवर अकरापक्षी मृत अवस्थेत आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पशुधन खात्याच्या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत.               दातली येथील लघुपाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्यात यावर्षी चांगले पाणी आले आहे. या बंधाऱ्यात काही नागरिक मासे पकडत असतांना त्यांना पाण्यावर पाणकोंबड्या मृत अवस्थेत तरंगत असल्याच्या आढळून आल्या. त्यांनी या घटनेची माहिती पशुधन विभागाला दिली. तालुका पशुधन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली वावीचे पशुधन अधिकारी डॉ. अरविंद पवार, वडांगळीचे डॉ. योगेश दुबे यांनी घटनास्थळी जावून धाव घेतली. व घटनेची माहिती वनविभागाला दिली.            वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांच्यासह राजाराम उगले, तुकाराम डावरे, रामनाथ सहाणे, बालम शेख यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही विभागाने ग्रामस्थांसमवेत होडीच्या मदतीने मृत पाणकोंबड्या बांधाऱ्यातून बाहेर काढल्या.यावेळी १० पाणकोंबड्यासह एक बदक मृत अवस्थेत आढळून आला. यातील तीन पाणकोंबड्या पशुधन खात्याच्या पश्चिम विभागीय रोग निदान पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या, तसेच गरज पडल्यास भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.                       हिमाचल, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रलगतच्या मध्ये प्रदेशात बर्ड फ्लूची लागण झाल्याने राज्यातील पोल्ट्री व्यायसायिक धास्तावले आहेत. बर्ड फ्लूूचे संकट टाळण्यासाठी प्रत्येक राज्याकडून खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर दहा पाणकोंबड्या मृत आढळून आल्याने सतर्कता म्हणून सदर मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरHealthआरोग्य