शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ४० कोटींचा निधी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 19:58 IST

सन २०१७-१८ या वर्षासाठी आदिवासी उपाययोजनांमधून नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील रस्त्यांचे बळकटीकरण, नवीन रस्त्यांची बांधणी व दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता

ठळक मुद्देआदिवासी तालुक्यांवर अन्याय : स्थायी समितीत जोरदार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील रस्ते बांधकामासाठी सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शासनाकडे परत गेल्याची बाब स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आली आहे. सदरचा निधी का परत गेला, त्याला जबाबदार कोण याचा खुलासा प्रशासनातील अधिकारी करू शकले नाहीत. त्यामुळे सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.

स्थायी समितीच्या सभेत भास्कर गावित यांनी सदरचा प्रश्न उपस्थित केला. सन २०१७-१८ या वर्षासाठी आदिवासी उपाययोजनांमधून नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील रस्त्यांचे बळकटीकरण, नवीन रस्त्यांची बांधणी व दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. त्यासाठी कोणत्या रस्त्यांची कामे केली जाणार याचे अंदाजपत्रक तयार करून कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. तथापि, बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी कार्यारंभ आदेश काढले नाहीत, परिणामी मार्च-२०१९ मध्ये हा निधी पुन्हा शासनाकडे परत करावा लागला. भास्कर गावित यांनी सभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर निधी परत गेल्याचा खुलासा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांनी केला. त्यावर सदस्यांनी संताप व्यक्त केला. एकीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याची ओरड केली जाते, दुसरीकडे मात्र निधी मिळूनही अधिका-यांच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे पैसे परत जात असल्याची टीका करण्यात आली. या सा-या बाबीस जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न गावित, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी विचारला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनीही कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांना कामांची प्रशासकीय मान्यता का देण्यात आली नाही, अशी विचारणा करून धारेवर धरले. त्यावर गांगुर्डे यांनी निवडणूक आचारसंहितेचे थातूरमातूर कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सदरच्या निधीची पुन्हा शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले, मात्र त्यावर सदस्यांनी विश्वास ठेवला नाही, यापुढे मात्र निधी परत जाणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद