शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

जिल्हा परिषदेत पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

याप्रसंगी अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्‍वर, जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा कृषी विकास अधिकारी ...

याप्रसंगी अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्‍वर, जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश पाटील, व्‍ही.डी. चौधरी, एन.डी. पाडवी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात रब्‍बी हंगामातील तृणधान्‍य, कडधान्‍य व गळीतधान्‍य पीक स्‍पर्धेत राज्‍यस्‍तरावर आदिवासी गटात रब्‍बी ज्‍वारीचे पीक घेत प्रथम पुरस्कार पटकावणारे खेडले, ता. तळोदा येथील शेतकरी आट्या देवजी पाडवी, व्दितीय नर्मदानगर, ता. तळोदा येथील नोवा आट्या पाडवी, तर तृतीय पारितोषिक पटकावणारे कळंबू, ता. शहादा येथील बापू नागो पवार या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गाैरविण्यात आले.

जिल्‍हास्‍तरावर सर्वसाधारण गटात गहू पिकांचे भरघोस पीक घेणारे शेतकरी चौपाळे, ता.नंदुरबार येथील छायाबाई मोहन चौधरी यांना प्रथम, ब्राह्मणपुरी, ता. शहादा येथील सुभाष दामू पाटील यांना द्वितीय, तर बोराळा, ता.नंदुरबार येथील शांतीलाल रामदास पाटील यांना तृतीय पारितोषिक देण्यात आला. आदिवासी गटात आडगाव, ता.शहादा येथील गौतम जयराम खर्डे यांना प्रथम, चितवी, ता.नवापूर साऱ्या टेट्या गावीत यांना द्वितीय, राणीपूर, ता. शहादा येथील गियान वेडू पावरा यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. रब्‍बी ज्‍वारी सर्वसाधारण गटात सोनवद, त.श. ता.शहादा येथील विजयाबाई अशोक पाटील यांना प्रथम, प्रकाशा, ता.शहादाचे रमेश परशराम पाटील द्वितीय, तर व्‍दारकाबाई सोमजी पाटील यांना तृतीय पारितोषिक दिले गेले.

आदिवासी गटात रब्‍बी ज्‍वारीचे पीक घेणारे प्रथम आलेले कन्‍साई, ता.शहाद्याचे निर्मलाबाई दिलवरसिंग ठाकरे, व्दितीय धांद्रे बु, .ता.शहादाचे सत्तरसिंग लालसिंग वाघ, तृतीय सखाराम काशिराम भिल, सर्वसाधारण गटात रब्‍बी हरभऱ्याचे पीक घेणारे व स्‍पर्धेत प्रथम आलेले पाडळदा खु., ता.शहाद्याचे विलास बन्‍सी पाटील, व्दितीय ब्राह्मणपुरी ता.शहादाचे प्रकाश हिरालाल चौधरी, तृतीय सावखेडा, ता.शहादाचे अंजनाबाई चतुर पाटील.

आदिवासी गटात हरभरा पीक घेणारे प्रथम आलेले रोझवा पुनर्वसन, ता.तळोदाचे बेहऱ्या सायसिंग पावरा, व्दितीय आडगाव, ता.शहादाचे दारासिंग अ‍रविंद रावताळे, तर तृतीय वडछिल, ता.शहादाचे सुनील राहुल्‍या वसावे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र व पुष्‍प देऊन सन्‍मान करण्‍यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, जगाचा पालन पोषण करणारा जो शेतकरी आहे, तो दुर्लक्षित असल्‍याचे सांगून शेतकऱ्याला आत्‍महत्‍या का कराव्‍या लागतात याचे आत्‍मपरीक्षण आपण सर्वांनी केले पाहिजे. शेती हा तोट्यातला व्‍यवसाय झाला आहे. इतर व्‍यवसायात विक्रेता त्‍यांच्‍या मालांची किमत ठरवतात; मात्र शेतकरी असा एक व्‍यक्‍ती आहे की ज्‍याला त्‍याच्‍या मालाची किमत ठरविण्‍याचा अधिकार नाही ही शोकांतिका आज पहायला मिळते. शेतीसाठीचा उत्‍पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्‍यामुळे उत्‍पादन व खर्च यांची सांगड घातली जात नाही. शेतकऱ्यांनी जीवनमान उंचावण्‍यासाठी शेतीसोबत जोडधंदा केला पाहिजे. सर्व कृषी विभागाने शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन करून शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ व सुविधा मिळवून देण्‍याची कृषिदिनी ग्‍वाही द्यावी, असे सांगितले.

प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भागेश्‍वर यांनी शेती हीच साऱ्या उद्योगाची जननी आहे. या विचारावर वसंतराव नाईकांचा जास्‍त भर असल्‍याने त्‍यांनी शेती आणि शेतकरीवर्गाला समृद्ध करण्‍यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीला बळकटी दिल्‍याचे सांगितले. प्रास्‍ताविक प्रदीप लाटे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कांगणे यांनी, तर आभार महेश विसपुते यांनी मानले.