शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 11:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेतर्फे आठ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावणार नाही यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी यांनी यावेळी बोलतांना केले.जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद शाळा, अजेपूर ता. नंदुरबारचे विशाल दिलीप पाटील, जिल्हा परिषद शाळा, वडसत्रा ता.नवापूरचे हेमंत बाबुराव सुर्यवंशी, जिल्हा परिषद शाळा म्हसावद (मुली) ता.शहादाचे रविंद्र सजन बैसाणे, जिल्हा परिषद शाळा दलेलपूर, ता.तळोदाचे नितीन बन्सीलाल महाजन, जिल्हा परिषद शाळा चिवलउतार ता. अक्कलकुवाचे जगदीश देवीदास पाटील, जिल्हा परिषद शाळा,चिंचकाठी ता.धडगांवचे अनिल फुरता पाडवी, जिल्हा परिषद शाळा बलवंड ता.नंदुरबारच्या सुशिलाबाई अंकुशराव पाटील, जिल्हा परिषद शाळा टेंभली ता.शहादयांच्याु रेखा सुरेश पाटील या शिक्षकांचा समावेश आहे.जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अध्यक्ष अ‍ॅड.सीमा वळवी होत्या. उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती सभापती अ‍ॅड.राम रघुवंशी, आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री पाटील, समाज कल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी शेखर रौंदळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता रमेश चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम उपस्थित होते.प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले. आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी मानले. सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले.सिमा वळवी यांनी सांगितले, जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्या तरी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबतची गोडी कमी होऊ देऊ नका असे आवाहन देखील त्यांनी केले. प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षकांतर्फे हेमंत सूर्यवशंी यांनी मनोगत व्यक्त केले.