शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला पुन्हा मुदतवाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:26 IST

निवडणूक आयोग : नंदुरबार वगळता इतर तिन्ही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया घेण्याचे निर्देश

नंदुरबार : धुळे जिल्हा परिषद प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी नंदुरबार जिल्हा परिषदेबाबत अद्याप काहीही निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला नसल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक आता न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून आहे. त्यामुळे विद्यमान पदाधिकारी व सदस्यांना मुदतवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.नंदुरबारसह धुळे, अकोला व वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती. डिसेंबर २०१८ अखेर या जिल्हा परिषदांची मुदत संपत असल्यामुळे आॅगस्ट महिन्यापासून गट, गण रचना व आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुर्ण करण्यात आली. परंतु याच दरम्यान आरक्षणाच्या मुद्यावरून काहीजण उच्च न्यायालयात गेले. त्यावर न्यायालयाने शासनाकडे स्पष्टीकरण मागविले.शासनाने आरक्षणाच्या तरतुदीबाबत विधीमंडळ अधिवेशनात तरतूद करण्यासंदर्भात मुदत मागून घेतली. परिणामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. परिणामी चारही जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.तीन महिन्याचा काळ संपलाराज्य शासनाने न्यायालयाकडे तीनन महिन्यांची मुदत मागीतली होती. या मुदतीत शासनाने कुठलाही अहवाल किंवा तरतुदींबाबत दुरूस्ती केल्या नाहीत.परिणामी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया घेण्यासंदर्भात राज्य शासनाला पत्र दिले. नंदुरबार वगळता अकोला, वाशिम व धुळे जिल्हा परिषदांच्या गट, गण रचना आणि आरक्षणाबाबत फारसा बदल होणार नसल्याचे गृहीत धरून राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्च रोजी अध्यादेश काढून स्थगित करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी मे किंवा जून महिन्यात धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे.नंदुरबारबाबत निर्णय नाहीनिवडणूक आयोगाने धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण व इतर बाबींची स्थगित करण्यात आलेली प्रक्रिया पुढे सुरू करण्याचे निर्देश दिले असले तरी धुळे जिल्ह्यातून विभाजन झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितींच्या या प्रक्रियेबाबत कुठलेही आदेश काढलेले नाहीत. प्रभाग रचना, आरक्षण, हरकती, सुनावणी व राजपत्रात प्रसिद्ध यासह इतर सहा टप्प्यांपैकी चार टप्प्यांची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. उर्वरित दोन टप्प्यांची प्रक्रिया पुर्ण होताच निवडणुकीची अधिसुचना जारी होणार होती. परंतु न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणूक लांबली. धुळे जिल्हा परिषदेसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.पुन्हा मुदतवाढ शक्यनंदुरबारचा निर्णय न्यायालयात प्रलंबीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने टाळले असल्याचे बोलले जात आहे. परिणामी विधीमंडळ अधिवेशनात आरक्षण तरतुदीत दुरूस्ती व ते न्यायालयाला सादर करणे आणि न्यायालयाने निकाल देणे या प्रक्रियेनंतरच नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरली तरी नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक या वर्षाअखेर किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वी होणे शक्य आहे. परिणामी या कालावधीपुरती पुन्हा जिल्हा परिषदेला मुदतवाढ मिळू शकते असे बोलले जात आहे.