शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कटलेला मांजा उचलत युनूसने पिंजले नंदुरबार शहर : इजा टाळण्यासाठी पुढाकार

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: January 16, 2018 13:13 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संपूर्ण नंदुरबारकर रविवारी मंकरसंक्रांतीच्या आनंदात रममान झाले होते, शहरातील घरांवरील छते, टेकडय़ा, उंच भागावर पतंग उडविण्याच्या आनंदात सर्व गुंग असताना ‘ते’ मात्र संपूर्ण शहरात पायी फिरुन पतंग उडविताना कटलेल्या मांजाचे संकलन करीत होता़ ‘त्यांनी’ सायंकाळकाठी तब्बल 15 किलो मांज्याचे संकलन केल़ेही गोष्ट आहे, नंदुरबारातील ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संपूर्ण नंदुरबारकर रविवारी मंकरसंक्रांतीच्या आनंदात रममान झाले होते, शहरातील घरांवरील छते, टेकडय़ा, उंच भागावर पतंग उडविण्याच्या आनंदात सर्व गुंग असताना ‘ते’ मात्र संपूर्ण शहरात पायी फिरुन पतंग उडविताना कटलेल्या मांजाचे संकलन करीत होता़ ‘त्यांनी’ सायंकाळकाठी तब्बल 15 किलो मांज्याचे संकलन केल़ेही गोष्ट आहे, नंदुरबारातील चिराग गल्ली येथे राहत असलेल्या युनूस खान यांची़ नंदुरबार शहर गुजरातेला लागूनच असल्याने साहजिकच गुजरातेतील अनेक सांस्कृतिक परंपरेचा परिणाम येथेही जाणवत असतोच़ त्यामुळे संक्रांतीनिमित्त येथे होत असलेल्या पतंगोत्सवाचे आकर्षण काही औरच असत़े परंतु या उत्सवाला अनेक वेळा नायलॉनच्या मांजामुळे गालबोट लागण्याचीही शक्यता असत़े म्हणूनच की काय, युनूस हे मकरसंक्रांतीच्या दिवशी संपूर्ण शहरात फिरुन रस्त्यावर पडलेला, कुठे तारेत लटकलेला मांजा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावत होत़े युनूस प्रत्येक संक्रांतीला हा उपक्रम करीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े विशेष म्हणजे ते कुठल्याही सामाजिक संघटनेशी किंवा कुठल्याही फाऊंडेशनचे सदस्यदेखील नाहीत़ स्वयंस्फूर्तिने ते ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेतून हे कार्य करीत आहेत़  पतंगोत्सवात अनेक वेळा मांजामुळे गळ्याला इजा होण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे युनूस खान करीत असलेल्या या कार्याला विशेष महत्व प्राप्त झाले आह़े