शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरणासाठी तळोद्यातील युवक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भविष्यात पुन्हा दुष्काळी आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी तळोदा शहरातील तरूण एकवटले असून, या तरूणांनी  येथील महसूल प्रशासनाची भेट घेऊन शासकीय विहिरी व कुपनलिकांमध्ये जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी नगरपालिकेकडे कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रभारी तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली.एकेकाळी पाण्यासाठी संपूर्ण तळोदा तालुका सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जात होता. कारण अवघ्या 20 ते 25 फुटावर पाणी होते. तथापि, अलिकडच्या 10 ते 12 वर्षापासून सातत्याने पजर्न्यमानात घट होत असल्यामुळे तळोदा वासियांनाही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. यंदा तर सरासरीच्या निम्मेही पाऊस न झाल्यामुळे शहराबरोबरच तालुक्याच्या इतिहासात प्रथमच भीषण दुष्काळाची परिस्थिती          निर्माण झाली आहे. या दुष्काळी स्थितीबाबत सर्व सामान्यांमध्ये चर्चा होत असतांना दिसून येत आहे. माळी समाजातील तरूण वर्गाने तर सर्वाच्या सहकार्यातून नदी नांगरटी आणि खोलीकरणाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहे. साहजिकच इतर तरूणांनीदेखील भविष्यात दुष्काळी स्थिती व पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून पावसाचे वाया जाणा:या पाण्यातून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने तरूणांनी गुरूवारी               नायब तहसीलदार रामजी राठोड             यांची भेट घेतली होती. त्यांनी शहरातील विविध शासकीय              विहिरी व कुपनलिका पुनर्भरण करण्याची भावना बोलून दाखविली. विशेषत: मोठा माळीवाडय़ातील डॉ.मगरे यांच्या घरासमोर  15 वर्षापूर्वी तत्कालीन नगरसेवकांनी बोअरवेल केलेली आहे. त्या शेजारीच नगरपरिषदेची जुनी विहीर असून, त्यावर सद्याच्या परिस्थितीत सिमेंट क्राँक्रिटचा स्लॅब टाकून विहीर बंद करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे या कुपनलिकेची पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे ती निकामी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागून असलेल्या शेजारच्या विहिरीत लोकसहभागातून रेनवॉटर हाव्रेस्टींगसारखा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असून, पावसाचे पाणी सोडण्याकामी विहीर मोकळी करून द्यावी, अशी मागणी चंद्रकांत रामदास मगरे, दीपक राजाराम देवरे, हेमलाल धरमदास माळी, अनिल रमेश शिंपी, नीलेश धरमदास माळी, मनोज दगडू सूर्यवंशी, डॉ.सुहास गोविंद राणे यांनी केली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमिवर संपूर्ण शहरवासी एकवटून लोकसहभागातून व लोकवर्गणीतून गेल्या आठ ते दहा दिवसांपासन अहोरात्र जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर करीत आहेत. विशेषत: तरूणवर्ग यात अधिक सक्रीय आहेत. त्यांचा उत्साह पाहून स्वयंसेवी संस्था, सामाजिक ग्रुप, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून आर्थिक मदत करीत आहेत. मात्र प्रशासनातील सर्वच यंत्रणातील अधिका:यांना कामाच्या ठिकाणी साधी भेट देण्यास वेळ मिळू नये असा प्रश्न उपस्थित करून दुष्काळी परिस्थतीबाबत अधिका:यांच्या असंवेदनशीलतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन वेगवेळ्या उपाययोजना राबवित आहे. प्रशासन या उपाययोजनांना तर सोडा नागरिक स्वत:हून लोसहभागातून लोकवर्गणीतून कामे करण्यासाठी पुढे येत आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकी देणे अपेक्षीत असतांना साधी विचारपूस केली नसल्याचे कार्यकत्र्याचे म्हणणे आहे. याउलट जिल्हा प्रशासनाने कामासाठी नाम फाऊंडेशनचे पोकलेन यंत्र उपलब्ध करून देवून कामांबाबत कार्यकत्र्याशी संवादही साधत आहेत.  एवढेच  नव्हे तर पुढील दोन-तीन दिवसात प्रत्यक्ष कामावर येवून भेट देण्याचेही कार्यकत्र्याना आश्वासीत केले आहे.