ब्राह्मणपुरी : मालवाहू टेम्पो व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा-खेतिया रस्त्यावर रायखेड येथील कालू शिवा भिल (२८) व सोनू चुनिलाल वाघ हे मोटारसायकलीने (एमएच ३९- के ३९६१) जात होते. समोरून आलेल्या मालवाहू टेम्पोने (क्रमांक एमएच २१ -एक्स ४०९६) मोटारसायकलीला जबर धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलस्वार दोघे फेकले गेले. त्यात कालू शिवा भिल हा जागीच ठार झाला तर सोनू चुनिलाल वाघ हा जबर जखमी झाला. जखमीला तातडीने शहादा रुग्णालयात हलविण्यात आले. विनोद भास्कर पाटील, रा.सुलतानपूर यांनी म्हसावद पोलिसांना खबर दिल्यानंतर पथक तेथे दाखल झाले. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
मोटारसायकल-टेम्पो अपघातात युवक ठार
By admin | Updated: March 4, 2017 23:51 IST