लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : औरंगपूर ता़ शहादा येथे अपघातात दहींदुले ता़ नंदुरबार येथील युवकाचा मृत्यू झाला़ ११ जून रोजी हा अपघात घडला होता़आकाश मंगल रणावत असे मयताचे नाव आहे़ ११ जून रोजी दुपारी चार वाजता औरंगपूर येथे एमएच १८ ९४०२ या दुचाकीवर तीन सीट बसवून भरधाव वेगात जात होता़ यात अपघात होवून जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला़ याबाबत राहुल पाडवी याच्या फिर्यादीवरून मयत आकाश याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल आहे़
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:48 IST