लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेलवाई ता़ तळोदा येथील 15 वर्षीय युवतीचा वारंवार पाठलाग करुन छेड काढत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ऑगस्ट 2019 पासून हा प्रकार सुरु होता़ शेलवाई येथील 15 वर्षीय युवतीचा सागर गणेश पाडवी हा गावातीलच युवक वेळावेळी पाठलाग करुन लगAाची मागणी घालत होता़ त्याला नकार दिल्यानंतरही त्याने पिच्छा सुरुच ठेवला होता़ दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी त्याने युवतीचा हात धरुन विनयभंग केला होता़ पिडित युवतीने तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सागर पाडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे करत आहेत़ पोलीसांकडून संशयिताचा शोध सुरु आह़े
शेलवाई येथे अल्पवयीन युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:35 IST