मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मतदारसंघात गेल्या निवडणुकीपर्यंत उच्च शिक्षीत उमेदवारांची वाणवाच राहत होती. यंदा मात्र, तब्बल तीन डॉक्टर, एक वकील, दोन पदव्युत्तर तर एक पदवीधारक अशा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.नंदुरबार मतदार संघात आतापर्यंतच्या निवडणुकीत सर्वाधिक शिक्षीत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या निवडणुकीत प्रथमच डॉक्टर उमेदवाराने मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. यावेळी देखील त्यांच्यासह तीन डॉक्टर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय वकीलीची पदव्युत्तर पदवी घेतलेले एक, कृषी विषयाची पदव्यूत्तर पदवी घेतलेले, शिक्षणशास्त्र विषयात बी.एड.केलेले व एक कला शाखेचे पदवीधारक आहेत.मुख्य लढत असलेल्या भाजपच्या उमेदवार हिना गावीत या एम.डी.डॉक्टर आहेत तर काँग्रेसचे उमेदवार के.सी.पाडवी हे विधी शाखेतील एलएलएम धारक आहेत. केवळ एकच उमेदवार नववी पास आहेत.
यंदा उच्च शिक्षीतांची भर तीन डॉक्टर तर एक वकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 21:28 IST