लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगारानिमित्त जिल्ह्यातून स्थलांतरीत झालेल्या पालकांसोबत सहा ते 14 वर्ष वयोगटातील 972 बालकांनी देखील स्थलांतर केले आहे. त्यात शहादा तालुक्यातील सर्वाधिक बालकांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. बालकांचा शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत जिल्ह्यातील सहा ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षण देण्यात येते, परंतु जिल्ह्यात फारसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने 14 वर्षार्पयतच्या मुलांचे पालक रोजगारासाठी परराज्य व राज्यांतर्गत स्थलांतर करीत आहे. मुळगावी मुलांना सांभाळायला कोणी राहत नसल्यामुळे पालकांसोबत मुलेही स्थलांतर करीत आहे. परंतु सहा ते आठ महिने पालक मुळगावी परतत नाही, त्यामुळे बहुसंख्य बालकांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा, तालुका, केंद्र व गाव पातळीवर विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. या समित्यांमार्फत जिल्ह्यात सव्र्हेक्षणही करण्यात आले. या सव्र्हेक्षणात काही जिल्ह्यातून सहा ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचे पालकांसोबत स्थलांतर झाल्याचे आढळून आले आहेत. त्यात शहादा तालुक्यातील बालकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे देखील दिसून आले आहेत. बालकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. स्थलांतरीत झालेले व स्थलांतराची तयारी करणा:या कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सव्र्हेक्षणानुसार हंगामी अनिवासी वसतिगृह सुरु करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. दिवाळीच्या सुटय़ा संपल्यानंतर हंगामी वसतिगृहांसाठी प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. विद्याथ्र्याची संख्या लक्षात घेत आवश्यकतेनुसार वसतिगृह सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत सांगण्यात येते.या वसतिगृहांचा लाभ प्रत्येक स्थलांतरीत कुटुंबातील बालकांना मिळणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. परराज्य व परजिल्ह्यातून आलेल्या बालकांसाठी देखील उपाययोजना करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाच्या समुपदेशनानंतर स्थलांतराच्या तयारीतील 277 बालकांना थांबविण्यात आले. त्यात अक्कलकुवा तालुक्यात 86, धडगाव 40, शहादा 36, तळोदा 68, नंदुरबार 47 अशी संख्या आहे.शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात 199 शाळाबाह्य बालके आढळून आली. त्यात धडगाव तालुक्यात सर्वाधिक 163, अक्कलकुव्यात 33, तळोद्यात दोन तर शहाद्यात एक अशी संख्या आढळून आली आहे.