शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

पाठय़पुस्तकांची यंदा दहा टक्के जादा मागणी

By admin | Updated: May 19, 2017 15:04 IST

यंदा पाठय़पुस्तके मंडळाकडून थेट तालुका गटसाधन केंद्रात पुस्तके पोहच

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 19 - नंदुरबार जिल्ह्यात यंदा तब्बल 12 लाख 36 हजार 82 पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे.  मराठी, गुजराती व उर्दू माध्यमातील इयत्ता पहिली ते आठवीसाठी ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदा पाठय़पुस्तके मंडळाकडून थेट तालुका गटसाधन केंद्रात पुस्तके पोहच होणार असल्यामुळे जिल्हा मुख्यालय ते तालुका दरम्यानच्या वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्याथ्र्याना मोफत पाठय़पुस्तके पुरविण्यात येतात. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 टक्के जादा पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. दोन लाख 32 हजार 640 पुस्तक संचांची मागणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय मागणीमध्ये नंदुरबार तालुक्यात दोन लाख 92 हजार 142 पुस्तके, शहादा तालुक्यात तीन लाख 25 हजार 172, नवापूर तालुक्यात एक लाख 75 हजार 682, तळोदा तालुक्यात एक लाख 17 हजार 113, अक्कलकुवा तालुक्यात एक लाख 87 हजार 466 तर धडगाव तालुक्यात एक लाख 38 हजार 507 पुस्तकांचा समावेश आहे. आतार्पयत एक लाख 14 हजार 649 पुस्तके मिळाली असून त्यांची टक्केवारी 9.28 टक्के असल्याची माहितीही उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी दिली.यंदा स्वाध्याय पुस्तिका दिल्या जाणार नसल्याचे पाठय़पुस्तक मंडळाने कळविले आहे. केवळ क्रमीक पुस्तके पुरविली जाणार आहेत. गेल्यावर्षार्पयत प्रत्येक विषयाची स्वाध्याय पुस्तिका दिली जात होती. यंदापासून ती बंद करण्यात आली आहे. तर पुढील वर्षापासून थेट विद्याथ्र्याच्या खात्यात पुस्तकांच्या किंमती इतकी रक्कम टाकली जाणार आहे. त्यामुळे पुस्तके वाटपाचा ताण कमी होणार आहे. गेल्या वर्षी दोन विषयांचे पुस्तके अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी मिळाले नव्हते. यंदा तसे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.