शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

पाण्यासाठी द:याखो:यात पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठी ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या पाडय़ांवरील हातपंप आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठी ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या पाडय़ांवरील हातपंप आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांना नदी-नाल्यात ङिारे तयार करून डोंगरद:यातील चढउताराच्या पायवाटेने पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.काठी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या माथाउखली व वाघडोंगरमाळ येथील हातपंप बंद तर पिपलाटेबा व सिसमपाडातील दोन पैकी एक हातपंप आटल्याने प्रत्येकी एकच हातपंप सुरू आहे. पिपलाटेबा, माथाउखली व वाघडोंगरमाळ येथील ग्रामस्थांना दोन किलोमीटर अंतरावरून भटकंती करीत मोलगीच्या उखलीपाडा येथील ङिा:यातून पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. तर वाघडोगरामाळ व माथाखुली पाडय़ावरील नागरिकांना लिबीपाडा व लोगवाईबारपाडा जवळील दरीतील डोंगरभाग उतरून नाल्यातील पाणी आणावे लागत आहे.पिपलाटेबा येथील दोन हातपंपापैकी एक बंद तर माथाउखली येथे एक हातपंप असून तोदेखील बंदवस्थेत आहे. तसेच वाघडोगरमाळपाडा येथे दोन हातपंप आहेत. मात्र हे दोन्ही हातपंप बंद असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सिसमपाडा येथे दोन हातपंप असून त्यातील एक बंद तर एक जेमतेमच सुरू आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने हे हातपंप बंद पडले आहेत. पिपलाटेबा, बारीलिबी, भांग्रापाणी शिवार, माथाउखली, वाघडोंगरमाळ, सिसमपाडा, मंदीरपाडा, राऊतपाडा या गावपाडय़ांवर पाणीटंचाई भासत असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकामी दोन ते तीन हातपंप मंजूर ते तातडीने कार्यान्वित करण्याची गरज आहे. तसेच वाघडोंगरमाळ व माथाउखली येथे टँकरची व्यवस्था करण्यासाठी काठी ग्रामपंचायतीने 8 मार्च 2019 रोजी मोलगी येथे पाणीटंचाई संदर्भातील बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक व गटविकास अधिकारी अक्कलकुवा यांना मागणीचे निवेदन दिले होते. मात्र अद्यापर्पयत पाणीटंचाई निवारणार्थ कुठल्याही प्रकारे उपाययोजना झालेल्या नाहीत. येथील पाणीटंचाई दूर करण्याकामी उपाययोजना करण्याची मागणी  काठी ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा जितेंद्र पाडवी यांनी केली आहे.