लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसस्थानक परिसरात बॅग लंपास करण्याचा प्रय} करणा:या एकास तेथील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना 27 रोजी घडली. बसस्थानक परिसरात भुरटय़ा चो:यांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहने व बॅग चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. 27 रोजी सायंकाळी मयुर सुनिलभाई गिरासे, रा.निझर हे बसस्थानक परिसरातील व्यापारी संकुल परिसरात खरेदीसाठी आले असता तेथे रऊफखान दिलावरखान पठाण, रा.कळंबू, ता.शहादा यांनी त्यांची बॅग घेवून पोबारा करण्याचा प्रय} केला. गिरासे यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करीत बॅग हिसवली. यावेळी इतरांनीही पठाण यास पकडले. परंतु उलट नागरिकांनाच पठाण हे शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी देवू लागला. त्याला नागरिकांनी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत मयूर गिरासे यांच्या फिर्यादीवरून रऊफखान दिलावरखान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पवार करीत आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
बॅग लपास करणारा चोरटा नागरिकांच्या तावडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:10 IST