शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

शेतीविकासाबाबत उपेक्षाची शहाद्याच्या सहकार मेळाव्यात चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 9:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शेतीच्या विकासाकरीता गुंतवणुक फार कमी आहे ती वाढवणे आवश्यक असून, शेतीत सर्वाधिक गुंतवणूक स्वत: ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शेतीच्या विकासाकरीता गुंतवणुक फार कमी आहे ती वाढवणे आवश्यक असून, शेतीत सर्वाधिक गुंतवणूक स्वत: शेतकरी करीत आहे. शेती उत्पादनाला पुरेसा भाव नसल्याने उत्पन्न घटले आहे. पुढच्या काळात शेती मालावर प्रक्रीया वाढवणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे  सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक तथा  रिझव्र्ह बँकेचे संचालक सतिष मराठे यांनी येथे सांगितले.लोणखेडा महाविद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित सातपुडा साखर कारखाना व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यात  सहकार क्षेत्रात काम करणा:या पदाधिकारी व कार्यकत्र्याचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, सहकार भारतीचे कोषाध्यक्ष गोपाळराव केले, विनय खटावकर, भारतीय बँक प्रकोष्ट संजय बिर्ला, संघटन प्रमुख दिलीप लोहार, सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विनोद सोनार, धुळे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, श्रीराम देशपांडे, डॉ.कांतीलाल टाटीया, खविसंचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, जि.प समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, कृऊबाचे सभापती सुनिल पाटील, पुरुषोत्तम नगरच्या सरपंच ज्योती पाटील, उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेशचंद चोरडीया, पं.स सभापती दरबारसिंग पवार, सराफ असोसिएशनचे विनोद सोनार आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना मराठे म्हणाले की, सहकार क्षेत्रात चढ उतार येत असतात अशा परिस्थितीत येथील सातपुडा सहकारी कारखाना सुस्थितीत सुरु आहे. हे विश्वासावर अवलंबून आहे. 25 हजाराहून अधिक सहकारी संस्था आज कार्यरत आहेत. गेली दोन वर्ष या क्षेत्राबाबत ग्रामीण भागात नाराजी आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात नव्या उमेदीने कार्य करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर र्निबध घालण्याचा प्रकार गेल्या काही दशकात झाल्याने याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होवून शेती विकासाकडे दुर्लक्ष केले गेले. गहु आणि हरभरा या पिकांकडे आधिक लक्ष दिल्याने शेतीचा खरा विकास झाला नाही. इतर देशांमध्ये पीक उत्पादनावर त्वरीत प्रक्रीया होवून चांगला बाजार भावही मिळतो या उलट भारतात परिस्थिती आहे. ऊस,कापूस आणि तेल बिया यांना आधिक मागणी आहे. परंतु शेती उत्पादनाला भारतात भाव नाही. शेती उत्पादनावर प्रक्रीया करणारे उद्योग उभे करण्याची गरज आहे. शेतीच्या विकासाकरीता गुंतवणुक फार कमी असून, ती वाढवणे आवश्यक आहे. शेतीत सर्वाधिक गुंतवणूक स्वत: शेतकरी करीत आहे. शेती उत्पादनाला पुरेसा भाव नसल्याने उत्पन्न घटले आहे. पुढच्या काळात शेती मालावर प्रक्रीया वाढवणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.या वेळी दीपक पाटील म्हणाले की, सहकाराची पायाभरणी स्व.पी.के अण्णा पाटील यांनी केली. भरपूर अडचणी आल्यात परंतु अडचणींवर मात करीत सहकार या भागात अबाधित ठेवला. सहकार क्षेत्रात मोठय़ा धाडसाने निर्णय घेतले आहेत. सहकार क्षेत्रात काम करणा:यांचा ज्ञानाचा उपयोग करुन घेतला पाहिजे. सहकार म्हणजे राजकारणा:यांचा अड्डा असे म्हटले जात आहे. यामुळे नैराश्याचे वातावरण पसरत आहे. सहकाराचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला असून तो कर्जबाजारी होत आहे. राजकीय पक्षापेक्षा आपण वैयक्तिक किती कार्य करतो हे महत्त्वाचे आहे. सहकार टिकवायचे असेल तर संघटन मजबूत होणे गरजेचे आहे. संजय बिर्ला म्हणाले, उत्तर महाराष्ट्रातील शहादा ही सहकाराची जननी आहे. बचत गट संपूर्ण समाजाचे उन्नतीचे माध्यम ठरु शकते. प्रास्ताविक सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर पाटील यांनी केले.